AI मुळे 20 वर्षानंतर मिळणार महिलेला आई होण्याचे सुख (फोटो सौजन्य - Google Gemini AI)
न्यूयॉर्कमधील एका जोडप्याची कहाणी आज जगभरात चर्चेचा विषय ठरते आहे. सुमारे 20 वर्षे बाळासाठी संघर्ष केल्यानंतर, त्यांना अखेर आनंदाची बातमी मिळाली आहे. 15 वेळा आयव्हीएफ उपचार अयशस्वी झाले, अनेक खंडातील तज्ज्ञांचा सल्ला या जोडप्याकडून घेण्यात आला होता, परंतु प्रत्येकवेळी ते अयशस्वी झाले. पण जेव्हा आशेचे सर्व किरण मावळत होते, तेव्हा कोलंबिया विद्यापीठात तयार केलेल्या AI आधारित प्रजनन उपकरणाने आश्चर्यकारक काम केले असल्याचे आता समोर येत आहे.
या उपकरणाचे नाव स्टार (स्पर्म ट्रॅक अँड रिकव्हरी) आहे, ज्याने वंध्यत्वाच्या उपचारात एक क्रांतिकारी वळण आणले असल्याचे आता जगात समोर आले आहे. नक्की काय घडले आहे आणि याचा उपयोग कसा करण्यात आला याची माहिती आपण या लेखातून घेऊया. हे केवळ वैद्यकीय प्रगती नाही तर तंत्रज्ञान, संयम आणि मानवी भावनांचाही विजय आहे. ही कहाणी लाखो जोडप्यांसाठी आशेचा एक नवीन किरण आहे जे मूल नसल्याच्या दुःखातून जात आहेत. (फोटो सौजन्य – Google Gemini AI)
काय आहे STAR आणि कसे करते काम?
STAR ही एक AI प्रणाली आहे जी सामान्यतः शुक्राणू नसलेल्या वीर्य नमुन्यांमध्येदेखील जिवंत शुक्राणू शोधते, सामान्य स्वरूपात यात स्पर्म दिसत नसले तरीही AI च्या या उपकरणामुळे स्पर्म शोधण्यास मदत मिळते.
डॉक्टर ज्याला “गवताच्या ढिगाऱ्यात सुई शोधणे” म्हणतात, ते STAR काही तासांतच साध्य करते आणि इतक्या काळजीपूर्वकपणे हे साध्य केले जाते की, शुक्राणू IVF मध्ये वापरण्यासाठी सक्षम राहतात आणि महिला गरोदर होऊ शकतात
‘या’ व्यसनापायी महिलांमध्ये येतंय वंध्यत्व आणि पुरूष होत आहेत नपुसंक, 3 व्यवसांपासून रहा दूर
कसे झाले शक्य
न्यूयॉर्कमधील या जोडप्याच्या बाबतीत, सामान्य प्रयोगशाळेतील तंत्रज्ञांना दोन दिवसांपर्यंत नमुन्यात एकही शुक्राणू सापडला नाही. परंतु STAR ला फक्त एका तासात 44 जिवंत शुक्राणू आढळले. त्यानंतर, मार्च 2025 मध्ये कोणत्याही पुढील शस्त्रक्रिया किंवा हार्मोनल उपचारांशिवाय IVF करण्यात आला आणि तो यशस्वी झाला. आता हे जोडपे त्यांच्या पहिल्या मुलाच्या आगमनाची वाट पाहत आहेत
जेव्हा आशा मावळल्यासारखे वाटले तेव्हाच या जोडप्याने डॉ. झेव्ह विल्यम्स, कोलंबिया विद्यापीठातील प्रजनन तज्ज्ञ यांच्या संपर्कात आले आणि या डॉक्टरांच्या टीम एक अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करत होती ज्याचे नाव आहे स्पर्म ट्रॅक आणि रिकव्हरी आणि याचाच वापर करण्यात आला.
Azoospermia: पुरुषांमधील वंध्यत्वाचे छुपे कारण
या प्रकरणात, पतीला अॅझोस्पर्मिया होता, म्हणजेच वीर्यामध्ये शुक्राणू आढळत नाहीत. Azoospermia चे दोन प्रकार आहेत:
त्याची कारणे – अनुवांशिक रोग, कर्करोग उपचार, हार्मोनल असंतुलन, ड्रग व्यसन किंवा शरीराच्या रचनेतील असामान्यता. आज STAR फक्त शुक्राणू ओळखण्यास मदत करते, परंतु भविष्यात AI या क्षेत्रांमध्ये देखील मदत करू शकते:
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.