Amazon Vs Flipkart: iPhone 16 वर कुठे मिळतेय बेस्ट डिल? ऑर्डर करण्यापूर्वी तपासा किंमत
दिवाळीच्या निमित्ताने तुम्ही देखील नवीन आयफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात का? तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. दिवाळीनिमित्त अॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट या दोन्ही ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर सेल सुरु झाला आहे. या सेलमध्ये अॅपल आणि सॅमसंगसह अनेक ब्रँड्सच्या स्मार्टफोनवर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. केवळ अँड्रॉईडच नाही तर या सेलमध्ये आयफोन मॉडेलवर देखील मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे.
गेल्यावर्षी लाँच करण्यात आलेल्या आयफोन 16 वर आता मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. या आयफोनवर सध्या उत्कृष्ट डिल्स ऑफर केल्या जात आहेत. त्यामुळे हा महागडा आयफोन देखील कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी उपलब्ध आहे. तर, जर तुम्ही नवीन आयफोन अपग्रेड करण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही ही संधी गमावू नका. तर, आयफोन 16 वर तुम्हाला सर्वोत्तम डील कुठे मिळणार आहे, जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
टेक जायंट कंपनीने iPhone 16 गेल्या वर्षी लाँच करण्यात आला होता. या स्मार्टफोनची लाँचिंग किंमत 80,000 रुपये होती. मात्र कंपनीची नवीन iPhone 17 सीरीज लाँच होताच कंपनीने iPhone 16 ची किंमत तब्बल 10 हजार रुपयांनी कमी केली. त्यामुळे यानंतर iPhone 16 ची किंमत 70 हजार रुपये झाली होती. आता सुरु असणाऱ्या दिवाळी सेलमध्ये या आयफोनची किंमत आणखी कमी झाली आहे. फ्लिपकार्टवर हा आयफोन 11,000 हजार रुपयांहून अधिकच्या डिस्काऊंटसह खरेदी केला जाऊ शकतो. फ्लिपकार्टवर तुम्ही iPhone 16 57,999 रुपयांच्या किंमतीत खरेदी करू शकणार आहात. कंपनी SBI क्रेडिट कार्डवर 1,000 रुपयांचं एक्स्ट्रा डिस्काउंट देखील ऑफर करत आहे. यानंतर आयफोन 16 ची किंमत 56,999 रुपये झाली आहे.
अॅमेझॉनवर देखील आयफोन 16 च्या खरेदीवर मोठ्या ऑफर्स उपलब्ध आहेत. अॅमेझॉनवर आयफोन 16 ची किंमत सध्या 62,900 रुपये झाली आहे. तथापि, बँक ऑफर असूनही, फोनची किंमत बरीच जास्त आहे. तथापि, फ्लिपकार्ट एक चांगली ऑफर देत आहे आणि तुम्हाला तो स्वस्त किमतीत खरेदी करण्याची संधी देत आहे.
फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर iPhone 16 मध्ये अनेक नवीन आणि एडवांस फीचर्स देण्यात आले आहेत. या डिव्हाईसमध्ये A18 Bionic चिप आहे, जी अधिक चांगला परफॉर्मेंस आणि बॅटरी एफिशिएंसी ऑफर करते. या डिव्हाईसमध्ये 6.1 इंचाचा Super Retina XDR OLED डिस्प्ले आहे जो आणखी ब्राइट आणि क्लियर विजुअल देतो.
काय आहे WhatsApp चं Custom Chat Lists फीचर, ज्यात फेव्हरेट चॅट अॅड करता येईल; जाणून घ्या
फोटोग्राफीसाठी या डिव्हाईसमध्ये 48MP चा मुख्य सेंसर आणि 12MP चा अल्ट्रा-वाइड लेंस आहे. ज्यामुळे फोटोग्राफीचा अनुभव अधिक चांगला होतो. याशिवाय या डिव्हाईसमध्ये iOS 18 ऑपरेटिंग सिस्टम, सॅटेलाइट कॉलिंग सपोर्ट आणि अधिक चांगली हीट मॅनेजमेंट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.