Flipkart Big Billion Days: ज्याची भिती होती, शेवटी तेच झालं! युजर्सचं स्वप्न भंगलं, Flipkart वर कॅन्सल झाल्या iPhone वाल्या ऑर्डर
फ्लिपकार्टवर 23 सप्टेंबरपासून बिग बिलियन डेज 2025 सेल सुरु झाला आहे. या सेलमध्ये स्मार्टफोनच्या किंमतीवर सर्वात जास्त भर देण्यात आला आहे. सेलदरम्यान अॅपल, सॅमसंगसह अनेक मोठ्या ब्रँड्सचे स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी उपलब्ध आहे. म्हणजेच फ्लिपकार्ट त्यांच्या ग्राहकांना महागड्या स्मार्टफोनवर मोठं डिस्काऊंट ऑफर करत आहे. त्यामुळे हे स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी केले जाऊ शकतात.
iPhone 17 मॉडेल्स की समस्यांचा भंडार! युजर्सना येताय एकामागून एक समस्या, कंपनीने काय सांगितलं?
सेलदरम्यान कंपनीने स्मार्टफोनच्या किंमती प्रचंड कमी केल्या आहेत. ग्राहकांनी सेलमधून मोठ्या प्रमाणात स्मार्टफोनची खरेदी केली आहे. विशेष म्हणजे जे ग्राहक गेल्या अनेक महिन्यांपासून आयफोन खरेदी करण्यासाठी थांबले आहेत. त्यांनी अखेर त्यांचं स्वप्न पूर्ण करत सेलमध्ये आयफोनची खरेदी केली आहे. सर्वात जास्त ऑर्डर iPhone 16 सीरीजसाठी आल्या आहेत. कारण कंपनीने या iPhone 16 सीरीजवर मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट ऑफर केलं आहे. त्यामुळे या सिरीजची किंमत प्रचंड कमी झाली. त्यामुळे अनेक ग्राहकांनी iPhone 16 सीरीज ऑर्डर केली. (फोटो सौजन्य – Pinterest)
@flipkartsupport @Flipkart @jagograhakjago Flipkart is running a scam and manipulating product prices , last day I ordered a phone and amount by deducted. Now I got a msg that your order is cancelled. If you don’t have stock for product why you are confirming them ?? pic.twitter.com/12qa1nGeZn — Thakur Banti Jadaun(क्षत्रिय) (@BantiJadaun) September 22, 2025
Sad to see that flipkart had cancelled soo many iPhone 16 series ordered during BBD Sale, This is the case every year and this is very sad How can this price drop be trusted? pic.twitter.com/Q1o2X80sKd — Techno Ruhez (@AmreliaRuhez) September 23, 2025
Big Billion Day = Big Fraud! 🚨 I ordered an iPhone 14 on @Flipkart during #BigBillionDays but today my order got cancelled WITHOUT any reason. This is cheating with customers. #FlipkartScam #FlipkartBigBillionDay#flipkartbigbilliondays2025#ScamAlert @Apple #ScamBBD pic.twitter.com/cOPgdbJ1UL — Umar Abbas (Md Tabrez Alam) (@Umar__Abbas) September 22, 2025
FLIPKART – THE BIG BILLION SCAM!😡
My brother placed an order for an iPhone in the Big Billion Day Sale. Order went through, payment confirmed, everything fine…and then guess what? Flipkart CANCELLED it automatically.
Billion Day – Big Billion FRAUD🤬 @Flipkart @flipkartsupport pic.twitter.com/dz4hSUx9dR — 𝕏 Comrade ✯✪ (@ComradePralav) September 22, 2025
सुरुवातीला ज्यांनी iPhone 16 सीरीज ऑर्डर केली, त्यांना वेळेवर डिलीव्हरी करण्यात आली. मात्र त्यानंतर अनेक ऑर्डर कॅन्सल करण्यात आल्याचा दावा केला जाऊ लागला. ऑर्डर कॅन्सल झाल्यानंतर अनेक युजर्सनी याबाबत एक्सवर पोस्ट शेअर करत तक्रार केली आहे. युजर्सनी सांगितलं आहे की, iPhone 16 आणि iPhone 16 Pro यूनिट्स अत्यंत कमी किंमतीत उपलब्ध होते, त्यामुळे अनेकांनी ही सिरीज ऑर्डर केली होती मात्र आता त्यांची ऑर्डर कॅन्सल करण्यात आली आहे.
खरं तर फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल रात्री उशीरा सुरु झाली. ज्यानंतर अनेक ग्राहकांनी केवळ 51,999 रुपयांत iPhone 16 (128GB) मॉडेल आणि 75,999 रुपयांत iPhone 16 Pro (128GB) मॉडेल बुक केले होते. गेल्या वर्षी लाखोंच्या किंमतीत लाँच करण्यात आलेले प्रोडक्ट्स आता अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्यासाठी उपलब्ध होते. फ्लिपकार्ट प्लस आणि ब्लॅक सदस्यांसाठी, डील 22 सप्टेंबरपासूनच लाईव्ह झाल्या. तेव्हापासून ऑर्डर बुक केल्या जाऊ लागल्या. मात्र अचानक या ऑर्डर कॅन्सल झाल्या.
सेल सुरु झाला आणि लोकांनी आयफोन ऑर्डर केला. त्यानंतर अनेक ग्राहकांचे पेमेंट देखील यशस्वी झाले. मात्र यानंतर काही तासांतच ऑर्डर कॅन्सल झाल्या आणि युजर्सना यासंबंधित नोटिफिकेशन देखील आले. त्यापैकी अनेकांनी X वर स्क्रीनशॉट शेअर केले आहेत, ज्यामध्ये प्लॅटफॉर्म “पेमेंट फेल्युअर्स” चा उल्लेख करतो, तर ग्राहक म्हणतात की त्यांचे पेमेंट पूर्ण झाले आहेत, मात्र कंपनीने अद्याप याबाबत कोणतीही माहिती दिली नाही.