तब्बल 18 वर्षांनंतर बंद होतंय Apple iPhone चं हे फीचर! नव्या लुकमध्ये करणार एंट्री
अमेरिकन टेक कंपनी Apple या आठवड्यात त्यांचा स्वस्त आयफोन लाँच करणार आहे. हा आयफोन iPhone SE 4 या नावाने लाँच केला जाणार आहे. अशी माहिती समोर आली आहे की, आगामी आयफोन डिव्हाईस फुल-स्क्रीन डिझाइनसह येईल आणि त्यात टच आयडीऐवजी फेस आयडी दिला जाणार आहे. याचा अर्थ असा की अॅपल आता होम बटण असलेले कोणतेही नवीन आयफोन विकणार नाही. हे पहिल्यांदाच घडणार आहे. आातपर्यंत लाँच करण्यात आलेल्या आयफोनमध्ये होम बटण दिलं जात होत, मात्र यापूढे तस होणार नाही. तब्बल 18 वर्षांनंतर, आयफोनमधून टच आयडी फीचर बंद होणार आहे.
हातांची गरज नाही, आता डोळ्यांच्या इशाऱ्यावर काम करेल तुमचा iPhone! जबरदस्त आहे हे फीचर
2007 मध्ये आयफोनमध्ये होम बटण सादर करण्यात आले. जवळजवळ 5 वर्षांनंतर, आयफोन 5एस मध्ये टच आयडी फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन सादर करण्यात आले. यानंतर, 2017 मध्ये आयफोन एक्स फेस आयडी फीचरसह लाँच करण्यात आला आणि तेव्हापासून अॅपलने हे फीचर टप्प्याटप्प्याने बंद करण्यास सुरुवात केली. आता अखेर कंपनीने घोषणा केली आहे की, आयफोनमधून टच आयडी फीचर बंद होणार आहे. त्यामुळे आगामी आयफोन एका नव्या लूकमध्ये पाहायला मिळणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
iPhone SE मध्ये आयफोन 8 चा जुना लूक येतो. यात होम बटण, लाइटनिंग पोर्ट आणि जाड बेझल आहेत. लवकरच लाँच केला जाणारा iPhone SE 4 एका नवीन लूकमध्ये एंट्री करणार आहे. यामध्ये फेस आयडीसह आयफोन 14 आणि आयफोन 16 चे फीचर्स उपलब्ध असतील. असे मानले जाते की ते 6.1 -इंचाच्या OLED डिस्प्ले, USB-C पोर्ट आणि मागील बाजूस 48MP सिंगल कॅमेरासह लाँच केला जाईल. यात अॅपलचा इन-हाऊस 5G मॉडेम, A18 चिप आणि 8GB रॅम असण्याची अपेक्षा आहे. आगामी आयफोन अॅपल इंटेलिजेंस सपोर्टसह लाँच केला जाणार आहे.
iPhone SE 4 हा कंपनीचा स्वस्त रेंजमधील आयफोन असणार आहे. त्यामुळे हा ग्राहकांना कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. मात्र असं सांगितलं जात आहे की, iPhone SE 4 ची किंमत iPhone SE 3 पेक्षा जास्त असणार आहे. iPhone SE 3 हा 2022 मध्ये भारतात सुमारे 43,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला होता. यावेळी iPhone SE 4 ची किंमत 49,900 रुपयांपर्यंत वाढू शकते. तथापि, कंपनीकडून अधिकृतपणे याची पुष्टी झालेली नाही.
आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार, आयफोन 14 आणि आयफोन 16 चे फीचर्स iPhone SE 4 मध्ये मिळू शकतात. हे मॉडेल 6.1-इंचाचा OLED डिस्प्ले आणि USB-C पोर्टसह येईल. कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर, त्याच्या मागील बाजूस 48 एमपीचा सिंगल कॅमेरा असेल. कामगिरीच्या बाबतीत, ते आयफोन 16 शी स्पर्धा करेल. आयफोन 16 प्रमाणे, यात कंपनीचा फ्लॅगशिप A18 चिपसेट असू शकतो, जो 8 जीबी रॅमसह जोडला जाईल. यात किमान 128 जीबी अंतर्गत स्टोरेज आणि अॅपल इंटेलिजेंस सपोर्ट असण्याची अपेक्षा आहे.