अद्भुत! आता चक्क रिंग कंट्रोल करणार तुमचा लॅपटॉप, Samsung ने तयार केलं अनोखं तंत्रज्ञान; जाणून घ्या सविस्तर
टेक कंपनी सॅमसंग एका नवीन प्रोडक्टवर काम करत आहे. हे प्रोडक्ट आहे सॅमसंग न्यू जनरेशन गॅलेक्सी रिंग 2. काही महिन्यांपूर्वी सॅमसंगने एक स्मार्टरिंग लाँच केली होती. त्यानंतर आता त्याचे नवीन अपग्रेड लाँच केलं जाणार आहे. ही आगामी स्मार्टरिंग पूर्वी लाँच केलेल्या रिंगपेक्षा अधिक प्रगत असण्याची शक्यता आहे. जी युजर्सची अनेक कामांत मदत करू शकते. अशी देखील एक अपडेट समोर आली आहे की, ही आगामी स्मार्ट रिंग चक्क तुम्हाला लॅपटॉपसारखे गॅझेट्स कंट्रोल करण्यासाठी मदत करणार आहे.
तयार आहात ना! या आठवड्यात ओपन होणार Apple चा मॅजिक बॉक्स, iPhone SE 4 सह लाँच होणार हे गॅझेट्स
कंपनी लवकरच सॅमसंग न्यू जनरेशन गॅलेक्सी रिंग 2 बद्दल घोषणा करू शकते आणि त्याची लाँच डेट देखील जाहीर करू शकते. मात्र यापूर्वी लाँच केलेल्या स्मार्टरिंगच्या भन्नाट फीचर्समुळे आता नवीन रिंगमध्ये काय खास असणार याबद्दल सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. सध्या कंपनी या सॅमसंग न्यू जनरेशन गॅलेक्सी रिंग 2 वर काम करत असून लवकरच त्याचे फीचर्स आणि इतर डीटेल्स शेअर केले जाऊ शकतात. या सॅमसंग न्यू जनरेशन गॅलेक्सी रिंग 2 चे काही स्पेसिफिकेशन्स लिक झाले आहेत, त्याबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
सॅमसंगने WIPO ( World Intellectual Property Organisation) कडे नवीन पेटंट दाखल केल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यावरून असे दिसून येते की ही स्मार्ट रिंग लॅपटॉप आणि टॅब्लेट सारख्या इतर उपकरणांना नियंत्रित करू शकते. त्यामुळे युजर्सचे काम अधिक सोपं होणार आहे.
पेटंटनुसार, सॅमसंगची स्मार्टरिंग लॅपटॉप, टॅब्लेट आणि इतर डिस्प्ले-आधारित डिव्हाईससोबत कनेक्ट होईल. ज्याच्या मदतीने वापरकर्ते स्क्रीनवरील वस्तू हलवू शकतील. या आगामी रिंगच्या मदतीने तुम्ही डिव्हाइस नियंत्रित करण्यास देखील सक्षम असाल. ही स्मार्टरिंग दोन उपकरणांमध्ये कनेक्शन इंस्टॉल करण्यासाठी पूल म्हणून काम करेल. ज्यामुळे स्क्रीनवर असलेला डेटा शेअर करण्याची सुविधा उपलब्ध होईल.
एवढेच नाही तर या स्मार्टरिंगमध्ये अॅपलच्या कंटिन्युइटी फीचरसारखे फीचर्स देखील मिळू शकतात. यामुळे, वापरकर्ते एका डिव्हाइसवरून दुसऱ्या डिव्हाइसवर सहजपणे डेटा ट्रान्सफर करू शकतील. इतर उपकरणांशी कनेक्ट होण्यासाठी, स्मार्टरिंग त्याच वायरलेस नेटवर्कशी कनेक्ट केलेले असणे आवश्यक आहे. या स्मार्टरिंगच्या मदतीने, एका उपकरणातून दुसऱ्या उपकरणात कंटीन्यूअस ट्रांजिशन शक्य होईल. तसेच, फायली सहजपणे ट्रान्सफर केल्या जाऊ शकतात.
याशिवाय, या स्मार्ट रिंगमध्ये डिव्हाइस नियंत्रित केले जाऊ शकते आणि हँड्स-फ्री नेव्हिगेशनची सुविधा देखील उपलब्ध असू शकते. स्मार्टरिंगच्या मदतीने आरोग्य आणि फिटनेस ट्रॅकिंगशी संबंधित माहिती देखील उपलब्ध होईल. ज्यामध्ये हार्ट रेट मॉनिटरिंग, स्लीप ट्रॅकिंग आणि इतर गोष्टींचा समावेश असू शकतो. सध्या हे फक्त पेटंट आहे आणि ते रिअल-टाइम डिव्हाइस म्हणून कधी लाँच केले जाईल याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.