गेल्या काही महिन्यांपासून लाखो युजर्सना त्यांच्या स्मार्टफोनच्या स्क्रीनवर ग्रीन लाइन्स दिसत आहेत. या विचित्र समस्येने युजर्स बऱ्याच काळापासून त्रस्त आहेत. OnePlus पासून Samsung पर्यंतच्या ब्रँडेड डिव्हाइसेसना देखील अशा समस्या येत आहेत आणि युजर्स या ग्रीन लाइन्सपासून सुटका मिळवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरत आहेत. अनेक यजर्सचा असा विश्वास आहे की हे सॉफ्टवेअर अपडेट डाउनलोड केल्यानंतर ही समस्या निर्माण होत आहे. याचे कारण काय असू शकते आणि ते सुधारण्याचे मार्ग काय असू शकतात ते समजून घेऊयात.
ग्रीन लाईनशी संबंधित समस्या कधीकधी सॉफ्टवेअरशी संबंधित त्रुटींमुळे उद्भवू शकतात. हे शक्य आहे की तुमच्या फोनसाठी आणलेल्या नवीनतम अपडेटमध्ये बग असू शकतो किंवा विद्यमान सॉफ्टवेअरमध्ये कोणता ग्लीच असू शकतो. याशिवाय काही ॲप्स इन्स्टॉल झाल्यानंतर फोनच्या डिस्प्लेवर परिणाम करू शकतात. अशा परिस्थितीत, या ग्रीन लाइन्स दुरुस्त करणे फार कठीण नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की, तुम्ही काही ट्रीक्सचा वापर करून यापासून सुटका मिळवू शकता.
हेदेखील वाचा – स्मार्टफोनमध्ये 5G असूनही इंटरनेट स्लो चालतोय? मग या सोप्या ट्रीक्सचा वापर करा, सुपरफास्ट चालेल इंटरनेट
अनेकदा फोन पडल्यानंतर किंवा शारीरिक नुकसान झाल्यास स्क्रीनवर फ्रिन लाइन्स दिसू लागतात. याशिवाय, डिस्प्ले आणि मदरबोर्डमधील कनेक्टर सैल किंवा खराब झाल्यास आणि काहीवेळा मॅन्युफॅक्चरिंग पार्टमधील डिफेक्ट देखील याचे कारण बनल्यास अशी समस्या उद्भवू शकते. इतकेच नाही तर फोन दीर्घकाळ वापरल्यानंतर जास्त गरम होणे किंवा जास्त दाब पडल्यास स्क्रीनवर ग्रीन लाइन्स येऊ शकतात. फोनच्या सर्व्हिस सेंटरमध्ये नेल्याशिवाय या प्रकारच्या समस्येचे निराकरण केले जाऊ शकत नाही.
तुमच्या फोनमधील स्क्रीनवरील ग्रीन लाइन्सची समस्या काही सॉफ्टवेअरमधील त्रुटींशी संबंधित असल्यास, ती दूर करण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात. सर्व प्रथम तुमचा फोन रीस्टार्ट करण्याचा प्रयत्न करा. याशिवाय, तुम्ही तुमच्या फोनमधून अलीकडे इंस्टॉल केलेले ॲप्स काढून टाकण्याचा प्रयत्न करू शकता. तुम्ही फोन सेफ मोडमध्ये अपडेट करू शकता आणि ग्रीन लाइन्स गायब होतात की नाही ते पाहू शकता. जर असे केल्याने तुमच्या फोनमधील या ग्रीन लाइन्स दिसत नसतील तर याचा अर्थ समस्या सॉफ्टवेअरशी संबंधित आहे.
हेदेखील वाचा – इलॉन मस्कने रचला इतिहास, टेस्लाचा नवा रोबोट लाँच, माणसांप्रमाणेच करणार सर्व कामे
तुमचा फोन फॅक्टरी रीसेट करून किंवा नवीनतम सॉफ्टवेअर व्हर्जनमध्ये अपडेट करण्याचा दुसरा पर्याय असू शकतो. अनेक ब्रँड्सनी त्यांचे फोन अपडेट करून ही त्रुटी दूर केली आहे. त्यामुळे ग्रीन लाइन्स दूर करण्यासाठी तुम्ही या पर्यायाचा देखील अवलंब करून पाहू शकता. तरीही ते काम करत नसल्यास आणि समस्या हार्डवेअरशी संबंधित असल्यास, तुम्हाला जवळच्या सर्व्हिस सेंटरमध्ये जावे लागेल.