सॅमसंग बीस्पोक एआय अप्लायन्सेसवर अभूतपूर्व डिल्स
सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने आज त्यांचे सर्वात मोठे उत्सवी साजरीकरण ‘द बिग बीस्पोक एआय फेस्टिवल’ची घोषणा केली, जेथे ग्राहकांना बीस्पोक एआय डिजिटल अप्लायन्सेसवर आकर्षक डिल्स व रिवॉर्ड्सचा आनंद घेता येईल. २६ ऑक्टोबर २०२५ पर्यंत वैध असलेली ही मोहिम ग्राहकांना सॅमसंगच्या बीस्पोक एआय श्रेणीवर विशेष ऑफर्स, कॅशबॅक व उत्सवी रिवॉर्ड्सच्या माध्यमातून आधुनिक एआय-समर्थित इनोव्हेशन्ससह त्यांच्या घरांना अपग्रेड करण्यास मदत करेल. या मोहिमेसह सॅमसंग यंदा सणासुदीच्या काळात भारतातील ग्राहकांसाठी कनेक्टेड, सर्वोत्तम व ऊर्जा-कार्यक्षम तंत्रज्ञान अधिक सहजसाध्य करत आहे.
‘बिग बीस्पोक एआय फेस्टिवल’दरम्यान ग्राहक निवडक बीस्पोक एआय अप्लायन्सेसवर जवळपास ५०,००० रूपयांची कॅशबॅक आणि विविध मॉडेल्सवर जवळपास ४७ टक्के सूटचा आनंद घेऊ शकतात. या ऑफर्स रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्स, मायक्रोवेव्ह्ज व एअर कंडिशनर्सवर आहेत, ज्यामुळे सॅमसंगच्या आधुनिक नाविन्यतांमध्ये अपग्रेड होण्याची ही परिपूर्ण वेळ आहे. अपग्रेडला अधिक विनासायास करण्यासाठी सॅमसंग त्यांच्या २०/५ फायनान्स योजनेअंतर्गत निवडक रेफ्रिजरेटर्स व वॉशिंग मशिन्सवर विशेष ‘१ ईएमआय ऑफ’ फायद्यासोबत झीरो डाऊन पेमेंटसह स्थिर फायनान्स पर्याय देखील देत आहे. या योजनेअंतर्गत सॅमसंग पहिल्या ईएमआयचे पेमेंट करेल, तसेच ग्राहक खरेदीच्या वेळी ५ महिन्यांसाठी ईएमआय आधीच भरू शकतात. उर्वरित रक्कम २० महिन्यांमध्ये नो-कॉस्ट ईएमआय म्हणून आकारण्यात येईल.
“द बिग बीस्पोक एआय फेस्टिवल’सह आम्ही भारतातील कुटुंबांसाठी सॅमसंगचे सर्वात प्रगत, ग्राहक-केंद्रित नाविन्यता आणत आहोत. बीस्पोक एआय श्रेणी अधिक सोयीसुविधा देण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे, जी दैनंदिन जीवन सोपे करते, तसेच श्रेणींमध्ये वैयक्तिकृत, ऊर्जा-कार्यक्षम अनुभव देते. ही ग्राहकांसोबत सणासुदीचा काळ साजरे करण्याची सॅमसंगची पद्धत आहे, ज्यामुळे विशेष ऑफर्स, कॅशबॅक आणि विस्तारित वॉरंटीच्या माध्यमातून कनेक्टेड व सर्वोत्तम तंत्रज्ञान अधिक सहजसाध्य होत आहे. या मोहिमेमधून नाविन्यतेप्रती आमची कटिबद्धता दिसून येते आणि भारतातील ग्राहकांच्या सर्वसमावेशक जीवनशैलींशी पूरक आहे,” असे सॅमसंग इंडियाच्या डिजिटल अप्लायन्सेसचे उपाध्यक्ष गुफरान आलम म्हणाले.
ग्राहक सॅमसंगच्या बीस्पोक एआय एसींवर देखील आकर्षक ऑफर्सचा आनंद घेऊ शकतात, जेथे २२ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर २०२५ दरम्यान केलेल्या खरेदींवर जवळपास २१,००० रूपयांची बचत करू शकतात. फायद्यांमध्ये बीस्पोक एआय एसींवर जीएसटी कपातीची बचत, विस्तारित वॉरंटी, व्यावसायिकाकडून मोफत इन्स्टॉलेशन आणि निवडक मॉडेल्सवर कॅशबॅकचा समावेश आहे, ज्यामुळे सॅमसंगसह घरामध्ये प्रगत कूलिंग आणण्याची ही परिपूर्ण वेळ आहे.
iPhone 17 मॉडेल्स की समस्यांचा भंडार! युजर्सना येताय एकामागून एक समस्या, कंपनीने काय सांगितलं?
उत्सवी आनंदामध्ये अधिक उत्साहाची भर करत सॅमसंग निवडक मायक्रोवेव्हवर पूरक बोरोसिल किट देत आहे; ग्राहकांना सॅमसंगच्या उद्योगामधील सर्वोत्तम वॉरंटींसह रेफ्रिजरेटर्समधील डिजिटल इन्व्हर्टर कम्प्रेसरवर आणि वॉशिंग मशिनमधील डिजिटल इन्व्हर्टर मोटरवर २० वर्षांची वॉरंटीचा समावेश आहे, ज्यामुळे आगामी काळासाठी समाधानाची खात्री मिळते.
उत्सवी ऑफर्सची संपूर्ण श्रेणी सॅमसंग रिटेल आऊटलेट्स, आघाडीचे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स आणि Samsung.com वर उपलब्ध आहे. कुटुंबासोबत डिनरचा आस्वाद घ्यायचा असो, अधिक मिष्टान्ने स्टोअर करायचे असो किंवा घरांमध्ये वैयक्तिक स्टाइलची भर करायची असो सॅमसंग बीस्पोक अप्लायन्सेस घरी आणण्याची ही परिपूर्ण वेळ आहे.