BSNL Recharge Plan: वर्षभर रिचार्जची चिंता नाही! BSNL च्या 'या' प्लॅनमध्ये मिळतेय 365 दिवसांची व्हॅलिडीटी आणि बरंच काही
Apple WWDC 2026: आयफोनमध्ये iOS 27 अपडेट कसं डाऊनलोड कराल? स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही प्रोसेस
टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने त्यांच्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये कंपनीने त्यांच्या दिर्घकाळ व्हॅलिडीटी प्लॅनबाबत माहिती शेअर केली आहे. भारत संचार निगम लिमिटेडच्या या रिचार्ज प्लॅनची किंमत 2799 रुपये आहे. या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या फायद्यांबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये यूजर्सना 365 दिवसांची म्हणजेच संपूर्ण वर्षभराची व्हॅलिडिटी ऑफर केली जाते. हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा ऑफर केली जाते. तसेच यूजर्सना मोफत नेशनल रोमिंगचा फायदा देखील मिळतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
What are you waiting for?
Choose the ₹2799/- plan Recharge smart via #BReX
👉 https://t.co/41wNbHpQ5c#BSNLIndia #StayConnected #InternetForEveryone #Digital #IndiaOnline #BSNLServices #SmartIndia #connectivity #2799plan @CMDBSNL @robertravi21 pic.twitter.com/8Wto3tew1z — BSNL India (@BSNLCorporate) June 7, 2026
बीएसएनएलच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये यूजर्सना डेली 3GB हाय स्पीड डेटा मिळतो. याचा अर्थ असा आहे की, 2799 रुपयांचा हा प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना एकूण 1095GB डेटा मिळतो. याव्यतिरिक्त या प्लॅनमध्ये डेली 100 फ्री एसएमएसची सुविधा देखील मिळणार आहे. भारत संचार निगम लिमिटेडचा हा एक दिर्घकाळ व्हॅलिडीटी असलेला रिचार्ज प्लॅन आहे. ज्या यूजर्सना वारंवार रिचार्ज करण्याचा कंटाळा येतो. अशा यूजर्ससाठी कंपनीचा हा प्लॅन उत्तम पर्याय आहे. म्हणजेच एकदा रिचार्ज केल्यानंतर संपूर्ण वर्षभर चिंता करण्याची गरज नाही.
GTA 6 खेळण्याचे तुमचेही स्वप्न राहू शकते अपूर्ण! ‘या’ कारणामुळे लाखो गेमर्स होणार निराश
अलीकडेच बीएसएनएलने एक स्वस्त रिचार्ज प्लॅन देखील लाँच केला होता. या प्लॅनची किंमत केवळ 51 रुपये आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना संपूर्ण भारतात अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. तसेच या प्लॅनमध्ये फ्री नॅशनल रोमिंगची सुविधा देखील मिळणार आहे. भारत संचार निगम लिमिटेडच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये डेली 2GB हाय स्पीड डेटा आणि 100 फ्री एसएमएस ऑफर केले जातात. या प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे. कंपनीची ही एक लिमिटेड टाईम ऑफर आहे. ही ऑफर 30 जून 2026 पर्यंत व्हॅलिड आहे. बीएसएनएल आपल्या नेटवर्कमध्ये सातत्याने सुधारणा करत आहे. यासाठी कंपनीने अलीकडच्या काळात मोठ्या संख्येने नवीन 4G/5G मोबाइल टॉवर्स उभारले आहेत.
Ans: बीएसएनएल मोबाईल नेटवर्क, 4G सेवा, ब्रॉडबँड, फायबर इंटरनेट, लँडलाइन आणि एंटरप्राइज कम्युनिकेशन सेवा पुरवते.
Ans: होय, बीएसएनएल देशभरात टप्प्याटप्प्याने 4G नेटवर्कचा विस्तार करत आहे.
Ans: बीएसएनएल 4G नेटवर्क विस्तारासोबतच 5G सेवांसाठीही तयारी करत आहे.






