Apple WWDC 2026: आयफोनमध्ये iOS 27 अपडेट कसं डाऊनलोड कराल? स्टेप बाय स्टेप फॉलो करा ही प्रोसेस
तुम्ही देखील तुमच्या आयफोनमध्ये iOS 27 डेव्हलपर बीटा डाऊनलोड करणार असाल तर सर्वात आधी संपूर्ण डेटाचा बॅकअप घ्या. तसेच आयफोनची बॅटरी कमीत कमी 50 टक्के चार्ज असेल याची खात्री करा. अपडेट डाऊनलोड करताना स्थिर वायफाय कनेक्शन आवश्यक आहे. डेव्हलपर बीटामध्ये बग्ज किंवा अॅप्स क्रॅशसारख्या समस्या येऊ शकतात, त्यामुळे सावध राहा. जर तुम्हाला स्टेबल आणि अधिक चांगला अनुभव पाहिजे असेल तर तुम्ही आयओएस पब्लिक बीटाची वाट पाहू शकता.






