कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) सदस्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी मंगळवार, २४ जून २०२५ रोजी सांगितले की, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने सुलभ निधी काढण्यासाठी भविष्य निर्वाह निधी (PF) ची ऑटो क्लेम सेटलमेंट मर्यादा वाढवली आहे. चला सविस्तर जाणून घेऊया वाढीव ऑटो क्लेम सेटलमेंट मर्यादेबद्दल
iPhone 15 वर मोठा डिस्काउंट; बेस्ट डील करू नका मिस…..
५ लाख रुपये काढता येणार
अहवालानुसार, EPFO सर्व ऍडव्हान्स क्लैमसाठी ऑटो क्लेम सेटलमेंटची मर्यादा ५ लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. पूर्वी ही मर्यादा ईपीएफओ सदस्यांसाठी १ लाख रुपये होती, जेणेकरून निधीचा वापर तात्काळ गरजांसाठी करता येईल. कोरोना महामारीच्या काळात भविष्य निर्वाह निधीने 2020 मध्ये आगाऊ दाव्यांचे ऑटो सेटलमेंट सुरू केले होते, जेणेकरून सदस्य सहजपणे निधी काढू शकतील.
EPFO ने म्हंटल आहे की ५ लाख रुपये वाढीव मर्यादेसह, ऍडव्हान्स क्लेमसाठी आता ऑटो सेटलमेंटद्वारे केले जाईल, ज्यामुळे ते सादर केल्यानंतर तीन दिवसांच्या आत प्रक्रिया करता येतील. ही सुधारित मर्यादा आणि निधीचा जलद प्रवेश यामुळे सदस्यांना सर्वात जास्त गरजेच्या वेळी आर्थिक मदत मिळण्यास मदत होईल.
ऑटो क्लेम सेटलमेंट कसं करत काम
ऑटो क्लेम सेटलमेंट ही स्वयंचलित प्रणालीद्वारे कार्य करते आणि त्यात कोणताही मानवी हस्तक्षेप नसतो. यामुळे जलद व्यवहार आणि ट्रांसपेरेंसी सुनिश्चित होते. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. ते भारतातील सर्व पगारदार कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध असलेली सेवानिवृत्ती लाभ योजना, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) चे व्यवस्थापन करते.
आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये, ईपीएफओने २.३४ कोटी आगाऊ दाव्यांवर ऑटो सेटलमेंटद्वारे प्रक्रिया केली, जी मागील वर्षाच्या तुलनेत 161 टक्क्यांनी वाढ आहे. उल्लेखनीय म्हणजे, 2024-25 मधील सर्व आगाऊ दाव्यांपैकी 59 टक्के दावे ऑटो मोडद्वारे निकाली काढण्यात आले. आर्थिक वर्ष 2025-26 च्या पहिल्या 3 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत, ईपीएफओने आतापर्यंत 76.52 लाख दावे ऑटो सेटलमेंट केले आहेत.
आता पासपोर्ट तुमच्या दारी! Mobile Passport Van बोलवा घरी, ऑनलाईन कसे कराल अप्लाय