MWC 2025: Camon 40 सिरीजचं ईव्हेंटमध्ये अनावरण, वन टॅप बटन आणि AI फीचर्सने सुसज्ज
मोबाइल वर्ल्ड कांग्रेस (MWC) 2025 बार्सिलोनामध्ये सुरु आहे. या ईव्हेंटमध्ये आतापर्यंत अनेक कंपन्यांनी त्यांचे नवीन गॅझेट्स लाँच केले आहेत. आता या ईव्हेंटमध्ये टेक कंपनी TECNO ने एका नवीन स्मार्टफोन सिरीज CAMON 40 चं अनावरण केलं आहे. या सिरीजमध्ये Tecno Camon 40, Camon 40 Pro, Camon 40 Pro 5G आणि Camon 40 Premier 5G यांचा समावेश आहे. या सिरीजमधील स्माार्टफोन्स वन टॅप बटन आणि AI फीचर्सने सुसज्ज आहे.
CAMON 40 सिरीजमधील फोनमध्ये नवीन वन-टॅप बटण आणि 50-मेगापिक्सेल सेल्फी शूटर देण्यात आला आहे. यामध्ये Tecno AI देखील आहे, ज्यामध्ये अनेक AI-बॅक्ड इमेजिंग आणि प्रोडक्टिविटी फीचर्स समाविष्ट आहेत. हे हँडसेट लवकरच निवडक जागतिक बाजारपेठांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकतात. या स्मार्टफोन सिरीजच्या भारतातील एंट्रीबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. (फोटो सौजन्य – X)
एका प्रेस रिलीजमध्ये, कंपनीने पुष्टी केली की Tecno Camon 40 सिरीजमधील फोन MediaTek Dimensity Ultimate प्रोसेसरद्वारे समर्थित आहेत. Tecno Camon 40 Premier 5G मध्ये MediaTek Dimensity 8350 Ultimate AI प्रोसेसर आहे. असे म्हटले जात आहे की हा चिपसेट असलेला हा पहिलाच हँडसेट आहे. Tecno ची ही नवीनतम सिरीज 12GB रॅम आणि 256GB ऑनबोर्ड स्टोरेजला सपोर्ट करते.
The CAMON 40 Pro 5G takes the crown with an remarkable 138 DXOMARK camera score, ranking #1 in DXOMARK’s Global Photography Ranking Under $600! Not stopping there, it’s also the first smartphone of 2025 to earn DXOMARK’s Smart Choice Label. @DXOMARK #CAMON40Series… pic.twitter.com/aM6Xk6XAYX
— tecnomobile (@tecnomobile) March 4, 2025
Tecno Camon 40 Premier 5G, Camon 40 Pro आणि Camon 40 Pro 5G हँडसेटना कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i प्रोटेक्शन आहे. त्यांना IP68 आणि IP69 धूळ आणि पाणी प्रतिरोधक रेटिंगसह प्रमाणित केल्याचा दावा केला जातो. यांना TÜV Rheinland सर्टिफिकेशन्स आहेत आणि ते 72 महिन्यांपर्यंत लॅग-फ्री परफॉर्मन्स देण्याचा दावा करतात. त्याच वेळी, व्हॅनिला Tecno Camon 40 मध्ये धूळ आणि पाण्याविरुद्ध IP66-रेटेड बिल्ड असल्याचे म्हटले जाते.
Camon 40 सीरीजमधील सर्व वेरिएंट्समध्ये AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहेत. त्यामध्ये Dolby Atmos ऑडिओसह स्टीरिओ ड्युअल स्पीकर युनिट्स देखील आहेत. टॉप-ऑफ-द-लाइन प्रीमियर 5G व्हेरिएंटमध्ये 5,100mAh बॅटरी आहे जी 70W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. ऑप्टिक्ससाठी, सर्व हँडसेटमध्ये 50-मेगापिक्सल सेल्फी शूटर्स आहेत. One-Tap Button सह AI-बॅक्ड FlashSnap मोड युजर्सना कोणत्याही लॅगशिवाय त्वरित प्रतिमा कॅप्चर करण्यास अनुमती देतो.
Tecno Camon 40 Premier 5G ला स्वान-नेक कर्व्ह डिझाइनसह लाँच करण्यात आले आहे. यात 50-मेगापिक्सेलचा Sony LYT-701 सेन्सर आहे, जो त्याच्या प्रतिस्पर्धी सेन्सर्सपेक्षा 56.25 टक्के जास्त लाइट कलेक्ट करण्याचा दावा करतो. याच्या मदतीने नाइट फोटोग्राफी अधिक चांगली होते. या हँडसेटवरील कॅमेरा सेटअपमध्ये 50-मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड अँगल शूटर आणि मागील बाजूस 50-मेगापिक्सल पेरिस्कोप टेलिफोटो कॅमेरा समाविष्ट आहे. यात सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी ऑटो फोकससह 50-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर देखील आहे. त्याच्या ‘इंडिपेंडेंट इमेजिंग चिप’मुळे ते रात्री किंवा कमी प्रकाशात 4K 60fps प्री-ISP व्हिडिओ कॅप्चर करू शकते.
Tecno Camon 40 सिरीजच्या फोनमध्ये AI Eraser 2.0, AIGC Portrait 2.0, AI Perfect Face, AI Sharpness Plus, AI Image Extender, Universal Tone, AI Writing आणि AI Translate सारख्या AI फीचर्सचा समावेश आहे. Ella AI असिस्टेंट यूजर्सना शेड्यूलिंग, नेव्हिगेशन आणि इमेज रेकग्निशनमध्ये मदत करण्याचा दावा करतो. हे हँडसेट गुगलच्या सर्कल टू सर्च फीचर आणि AI Call Assistant सह कॉल ट्रान्सलेशन आणि कॉल समरी टूल्सना देखील सपोर्ट करतात. कंपनीने अद्याप Tecno Camon 40 सिरीजमधील हँडसेटची किंमत आणि उपलब्धता याबद्दल अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही.