Flipkart Freedom Sale 2025: महागडा स्मार्टफोन स्वस्तात करा खरेदी, नो-कॉस्ट EMI आणि एक्सचेंज ऑफर्सचा असा घ्या फायदा
ई कॉमर्स फ्लिपकार्टने अलीकडेच द गोट सेल सुरु केला होता. या सेलनंतर आता पुन्हा एकदा कंपनी त्यांचा बहुप्रतिक्षित फ्लिपकार्ट फ्रीडम सेल 2025 सुरु करत आहे. 1 ऑगस्टपासून सर्व युजर्ससाठी फ्लिपकार्ट फ्रीडम सेल 2025 सुरु झाला आहे. Plus आणि VIP मेंबर्ससाठी हा सेल लवकर सुरु झाला होता. तर 1 ऑगस्ट रात्री 12 वाजल्यापासून सर्व युजर्ससाठी फ्लिपकार्टने त्यांचा सेल सुरु केला आहे. हा सेल म्हणजे ऑफर्स आणि डिस्काऊंटसह मनसोक्त शॉपिंग करण्याची सुवर्णसंधी.
स्वातंत्र्य दिनानिमित्त सुरु झालेला हा सेल 7 ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे. या सेलमध्ये गॅझेट्सवर मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. म्हणजेच तुम्ही स्मार्टफोनपासून फ्रीजपर्यंत अनेक गॅझेट्स ऑफर्स आणि डिस्काऊंटसह खरेदी करू शकता. Apple, Samsung, Nothing, Realme आणि Vivo सारख्या टॉप ब्रँड्सच्या स्मार्टफोनवर मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. स्टँडर्ड प्राइस कट्सव्यतिरिक्त, ग्राहक बँक कार्ड कॅशबॅक ऑफर, नो-कॉस्ट ईएमआय प्लॅन आणि एक्सचेंज डीलचा देखील लाभ घेऊ शकतात. ज्यामुळे आणखी बचत करण्याची संधी मिळणार आहे. (फोटो सौजन्य – X)
प्लेटफॉर्मने ICICI बँक आणि BoB कार्डसह पार्टनरशिप केली आहे. याअंतर्गत, क्रेडिट कार्ड आणि ईएमआय वापरून केलेल्या खरेदीवर 10% पर्यंत त्वरित सूट उपलब्ध असेल. शॉपर्स नो-कॉस्ट EMI प्लॅन्स आणि एक्सचेंज ऑफर्सचा फायदा घेऊ शकता. यासोबतच, फ्लिपकार्ट प्लस मेंबर्स SuperCoins चा वापर करून आणखी बचत करू शकतात.
फ्लिपकार्टने त्यांच्या वेबसाईटवर एका डेडिकेटेड लँडिंग पेजवर स्मार्टफोन डिल्सबाबत माहिती दिली आहे. फ्रीडम सेलदरम्यान, iPhone 16 ची किंमत 69,999 रुपये झाली आहे. म्हणजेच या फोनवर सुमारे 10 हजार रुपयांची बचत केली जाऊ शकते. Moto Edge 60 Fusion ची किंमत 25,999 रुपयांवरून 20,999 रुपये झाली आहे. Samsung Galaxy S24 FE स्मार्टफोन 35,999 रुपयांना खरेदी करण्याची संधी आहे. या फोनची लाँच किंमत 59,999 रुपये आहे. Galaxy S24 हा 74,999 रुपयांना लाँच करण्यात आला होता, मात्र आता सेलमध्ये हा फोन 46,999 रुपयांना उपलब्ध आहे.
iPhone 16e च्या 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 59,900 रुपये आहे. मात्र सेलमध्ये हा फोन 54,900 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध आहे. Nothing Phone हा 27,999 रुपयांना लाँच करण्यात आला होता. मात्र आता सेलमध्ये त्याची किंमत 21,999 रुपये झाली आहे. तर 21,999 रुपयांना लाँच करण्यात आलेला Vivo T4 5G फोन 20,999 रुपयांना खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. Realme GT 6 चा 12GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिअंट 32,999 रुपयांना लाँच करण्यात आला होता. मात्र आता त्याची किंमत 27,999 रुपये झाली आहे. Poco F7 5G फोन 31,999 रुपयांऐवजी 29,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो.
फ्लिपकार्ट सेलमध्ये केवळ स्मार्टफोन्सवरच नाही तर इतर इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट्सवर देखील मोठं डिस्काऊंट उपलब्ध आहे. सेलमध्ये लाइफस्टाइल प्रोडक्ट्स, वियरेबल्स, ग्रॉसरी, होम अप्लायंसेज आणि फर्नीचरसह इतर कॅटेगिरीमध्ये देखील ऑफर्स आणि डिस्काऊंट उपलब्ध आहे.
फ्लिपकार्ट सेलची शेवटची तारीख काय आहे?
7 ऑगस्ट 2025
कोणत्या वस्तूंवर मिळतंय डिस्काऊंट?
स्मार्टफोन्स, इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट्स, लाइफस्टाइल प्रोडक्ट्स, वियरेबल्स, ग्रॉसरी, होम अप्लायंसेज आणि फर्नीचर