(फोटो सौजन्य: X)
काय घडलं व्हिडिओत?
सदर घटना ही तामिळनाडूतील सेरकाझीजवळ घडल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओ गुरुवारी सोशल मिडिया प्लॅटफाॅर्मवर शेअर करण्यात आला ज्यानंतर काही तासांतच व्हिडिओला हजारो यूजर्सच्या व्हूज मिळाल्या. व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात, रेल्वे गेटकीपर रेल्वे ट्रॅकच्या किनाऱ्यावर उभं राहून नेहमीप्रमाणे आपली ड्यूटी करत असतो. अशातच अचानक त्याची नजर रेल्वे ट्रॅकवर उभ्या असलेल्या एका मुलाजवळ जाते. मुख्य म्हणजे यावेळी समोरुन भरधाव वेगात ट्रेन येत असते. अशात रेल्वे कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता लगेच मुलाजवळ जाऊन त्याला रेल्वे ट्रॅकच्या दुसऱ्या बाजूला खेचतो आणि त्याचा जीव वाचवतो. हा सीन कोणत्या चित्रपटाच्या सीनहून कमी नसतो, कारण ज्यावेळी रेल्वे कर्मचारी मुलाला दुसऱ्या बाजूला खेचतो, बरोबर त्याच्या काही सेकंदानंतरच तिथून ट्रेन पुढे निघून जाते. याचाच अर्थ काही सेकंदाचा जरी विलंब झाला असता तर निश्चितच या अपघातात मुलाचा बळी जाण्याची शक्यता होती.
सोशल मिडियावर या घटनेचा व्हिडिओ आता चांगलाच व्हायरल होत असून अनेकांनी रेल्वे कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानाचे काैतुक केले आहे. तसेच काहींनी त्याला पुरस्कार जाहीर करावा अशीही मागणी केली आहे. घटनेचा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले की, ‘तामिळनाडूतील सिरकाझीजवळ वेगवान ट्रेनच्या काही सेकंद आधी एका रेल्वे गेटकीपरने आपला जीव धोक्यात घालून एका माणसाला वाचवले’.
Railway Gatekeeper Risks His Life to Save Man Seconds Before Speeding Train Near Sirkazhi in Tamil Nadu pic.twitter.com/DJOQhUbnqd — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) July 9, 2026
व्हिडिओला चांगलेच व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने कमेंट सेक्शनमध्ये घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “तो खरा नायक आहे, त्याने मोठ्या धैर्याने एका व्यक्तीचा जीव वाचवला.”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “दुसरा माणूस आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत होता आणि तो तारणहार म्हणून आला”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “आदर! या द्वारपालाने क्षणभरही विचार न करता एका अनोळखी व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी थेट मृत्यूला सामोरा धाव घेतली. याला म्हणतात खरा पराक्रम. संदीप चहर, संपूर्ण भारत तुम्हाला सलाम करतो”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






