Israel Secret Mission : इराणसाठी धोक्याची घंटा! इस्रायलने सीमेजवळच उभारला मृत्यूचा सापळा, अमेरिकेचाही पाठिंबा? (फोटो सौजन्य: एआय जनरेटेड)
मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायल (Israel) आणि इराणमधील १००० मैलांचे अंतर पार करणे इस्रायलच्या हवाई दलासाठी मोठे आव्हान ठरत आहे. यावर तोडगा म्हणून इस्रायलने अमेरिकेच्या समंतीने पश्चिम वाळवंटात इराणच्या सीमेजवळ गस्त घातली आहे. याठिकाणी शोध आणि बचाव पथक तैनत करण्यात आले असून हल्ल्यात एखादे विमान कोसळल्याच वैमानिकांना तातडीने वाचवता येईल.
दुसरीकडे इराकने इस्रायलच्या या मोहिमेचा तीव्र विरोध केला आहे. इस्रायलच्या पथक तैनातीची माहिती मिळताच इराकच्या सैन्याने इस्रायलदलावर हवाई हल्ला केला होता. या चकामकीत इराकच्या एका सैनिकाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
इराकच्या काऊंटर टेररिझम सर्व्हिसने दिलेल्या माहितीनुसार, तपासात इस्रायली लष्कराच्या पश्चिम वाळवंटात अस्तित्वाचे पुरावे सापडले आहेत. शिवाय इस्रायलच्या हवाई दलाचे प्रमुख तोमर बार यांनीही त्यांच्या विशेष तुकड्या सीक्रेट मिशन राबवत असल्याचे सूचित केले होते. यामुळे संशय अधिकच वाढत आहे.
सुरुवातील इराकने या हल्ल्यांसाठी अमेरिकेला जबाबदार धरले होते. परंतु अमेरिकेने या मोहिमेत आपला सहभाग नसल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु मिळालेल्या पुराव्यानुसार, जेव्हा अमेरिकेचे F-15 विमान कोसळले होते. त्यावेळी इस्रायलने येथूनच मदतीचा प्रस्ताव दिला होता.
सध्या इस्रायलच्या या आक्रमक भूमिकेमुळे इराणसोबत अधिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. यामुळे इराण आक्रमक होऊन पुन्हा हल्ले सुरु करु शकतो. ज्यामध्ये आखादी देश भरडले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय या वाढत्या तणावामुळे होर्मुझ (Hormuz) मार्ग कायस्वरुपी बंद होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. ज्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर होऊ शकतो. यामुळे इंधन आणि गॅस टंचाई होऊ शकते.






