Google Pixel 10 सिरीजच्या लाँचिंगपूर्वी कमी झाली या फोनची किंमत! 20,000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी
काही तासांनंतर गुगलचा 2025 मधील सर्वात मोठा ईव्हेंट आयोजित केला जाणार आहे. या ईव्हेंटमध्ये कंपनी अनेक नवीन गॅझेट्स लाँच करणार आहे. या गॅझेट्समध्ये बहुप्रतिक्षित गुगल पिक्सेल 10 सिरीजचा देखील समावेश असणार आहे. या सिरीजचे काही स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. या सिरीजच्या लाँचिंगची युजर्स अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत. गुगल पिक्सेल 10 सिरीजच्या लाँचिंगची चर्चा सुरु असतानाच आता त्याच्या जुन्या मॉडेल म्हणजेच गूगल पिक्सेल 9 प्रो वर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे.
ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर गूगल पिक्सेल 9 प्रो ची किंमत कमी झाली आहे. हा स्मार्टफोन ऑफर्स आणि डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी उपलब्ध आहे. जर तुम्हाला गूगल पिक्सेल 9 प्रो खरेदी करायचा असेल तर ही उत्तम संधी आहे. कारण फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन फ्लॅट 20 हजार रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करता येणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
या स्मार्टफोनमध्ये 6.3 इंचाचा LTPO OLED डिस्प्ले दिला जाणार आहे. जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 3000 निट्स पीक ब्राइटनेसचा सपोर्ट करणार आहे. यामध्ये गूगल टेंसर G4 प्रोसेसर देण्यात आला आहे, ज्याला 16GB रॅम आणि 256GB च्या इंटरनल स्टोरेजसह जोडण्यात आले आहे. कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचं झालं तर यात OIS सह 50MP चा प्रायमरी कॅमेरा, 48MP पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स आणि मागील बाजूस 48MP चा अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात 42MP फ्रंट कॅमेरा आहे. यात 4700mAh शक्तिशाली बॅटरी आहे, जी 27W वायर्ड आणि 21W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते. या फोनला 7 वर्षांपर्यंत प्रमुख अँड्रॉइड अपग्रेड्स मिळत राहतील.
नव्या सिरीजच्या लाँचिंगपूर्वी जुन्या मॉडेलवर जबरदस्त डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. त्यामुळे तुम्ही गूगल पिक्सेल 9 प्रो अत्यंत कमी किंमतीत खरेदी करू शकता. हा स्मार्टफोन 1,09,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. मात्र आता फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनची किंमत 20,000 रुपयांनी कमी झाली आहे. ग्राहक नेट बँकिंग आणि क्रेडिट कार्ड इत्यादींवर इतर फायदे देखील घेऊ शकतात.
पिक्सेल 9 प्रो ची किंमत आयफोन 16 प्लसला टक्कर देत आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर आयफोन 16 प्लस ची किंमत 89,900 रुपये आहे. यामध्ये 6.7 इंच सुपर रेटिना XDR डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये डायनामिक आईलँड देखील आहे. आयफोनमध्ये A18 चिप आहे. यात 48MP प्रायमरी कॅमेरा आणि मागील बाजूस 12MP अल्ट्रा वाइड लेन्स आहे.
20 ऑगस्ट रोजी न्यू यॉर्कमध्ये दुपारी 1:00 वाजता ET वाजता मेड बाय गुगल 2025 ईव्हेंटला सुरुवात होणार आहे. या ईव्हेंटमध्ये अनेक गॅझेट्स लाँच केले जाणार आहेत. गुगलची नवीन Pixel 10 लाइनअप आगामी ईव्हेंटमध्ये लाँच केली जाणार आहे. या सिरीजमध्ये Pixel 10, Pixel 10 Pro, Pixel 10 Pro XL आणि Pixel 10 Pro Fold यांचा समावेश असणार आहे.