Grok AI ची वादग्रस्त उत्तर सोशल मीडियावर व्हायरल, X ला ठरवलं जबाबदार; Elon Musk च्या अडचणीत होणार वाढ? वाचा सविस्तर
Elon Musk च्या Grok AI चा वापर सध्या मोठ्या प्रमाणात केला जात आहे. तुमच्या प्रश्नांची उत्तर शोधण्यापासून ते अगदी एखादी ईमेज क्रिएट करण्यापर्यंत Grok AI तुम्हाला तुमच्या सर्व कामांत मदत करतो. Grok AI च्या फायद्यांसोबतच त्याच्या गैरवापरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. Grok AI चा गैरवापर सध्या प्रचंड वाढला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर नियंत्रित आणि सकारात्मक असला पाहिजे, ही संपूर्ण जगाची जबाबदारी आहे. परंतु काही कारणांमुळे हा वापर चुकीच्या पद्धतींमध्ये बदलत आहे.
हा गैरवापर आणि इतर देशांचे AI टाळण्याचा एकमेक मार्ग म्हणजे भारत सरकारने हे सुनिश्चित केले पाहिजे की, देश स्वतःचा चॅटबॉट तयार करेल आणि देशातील त्याच्या उत्तरांनाच अधिकृत मान्यता देईल. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रो यांच्यासोबत पॅरिसमध्ये झालेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषदेचे सहअध्यक्षपद भूषविताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, कृत्रिम बुद्धिमत्ता केवळ अर्थव्यवस्था, सुरक्षा आणि मानवी संसाधनांमध्येच नव्हे, तर राजकारणातही परिवर्तन घडवित आहे. त्यांचे हे विधान कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सकारात्मक परिणामाबद्दल होते, परंतु सध्या त्याचा दुसरा आणि नकारात्मक पैलू वेगाने पुढे येत आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
गेल्यावर्षी गुगलच्या एआय चॅटबॉट जेमिनीने पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. यानंतर सरकारने याबद्दल त्वरित कारवाई केली. या सर्व प्रकरणानंतर जेमिनी प्रत्येक वेळी बरोबर असू शकत नाही, त्याला मर्यादा आहेत, याबाबत गुगलला चेतावणी देण्यात आली होती. सरकारने त्वरित एआय जनरेटेड कंटेंटबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. जेमीनीने केलेल्या या हलगर्जीपणानंतर आता मस्कचा AI देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे.
सध्या ग्रोकची काही वादग्रस्त उत्तर सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या पार्श्वभूमीवर माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचा असा विश्वास आहे की, ग्रोकवरील सर्व वादग्रस्त उत्तरांसाठी एलॉन मस्कचा ‘एक्स’ जबाबदार आहे आणि त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. दुसरीकडे मंत्रालयाने स्पष्ट केले की, त्यांनी ग्रोकच्या उत्पादन कंपनी एक्सला कोणतीही नोटीस पाठविलेली नाही. मात्र या प्रकरणात एक्स आणि ग्रोक यांच्याशी चर्चा सुरू आहे.
सध्या ट्रम्प यांचे आवडते आणि ग्रोकचे मालक एलॉन मस्क यांची ताकद सर्वांनाच माहिती आहे, पण सत्य हे आहे की, ग्रोकच्या बाबतीत सरकारने एक्सबाबत इतकी कठोर भूमिका घेतली पाहिजे की, त्यामुळे अशा चॅटबॉट उत्पादकांना धडा शिकविता येईल. कारण वादग्रस्त उत्तर आणि चुकीची माहिती यामुळे अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. यामुळे भविष्यात अनेक मोठ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. जर एकच प्रश्न वेगवेगळ्या स्त्रोतांकडून विचारला गेला तर उत्तरे बहुतेकदा सारखीच असतात; परंतु ती वेगवेगळ्या शैलीत आणि वेगवेगळ्या अर्थाने असतात. ग्रोकच्या उत्तरामुळे सरकार, भाजपा, त्यांचे नेते आणि समर्थक अस्वस्थ होत आहेत. जर चॅटबॉट्स लोकशाही सरकारांच्या उणीवा दाखवित असतील तर ते स्वागतार्ह आहे, परंतु ते निःपक्षपातीपणे करीत आहेत याची कोणतीही हमी नाही.
Lava Shark स्मार्टफोनची भारतात एंट्री, किंमत 7 हजारांहून कमी; 50MP कॅमेरा आणि120Hz डिस्प्लेने सुसज्ज
चॅटबॉटच्या क्षेत्रात अमेरिकन कंपन्यांच्या वर्चस्वाला चीन आणि इतर देशांतील कंपन्यांनी Grok अरबने त्यांचा चॅटबॉट रेयान मैदानात उतरविला आहे. गेल्या काही महिन्यांत चॅटबॉटवरून शर्यत तीव्र झाली आहे. सौदी अरबने त्यांचा चॅटबॉट रेयान मैदानात उतरविला आहे. रेयान हे फक्त एक बाजार विश्लेषक आहेत, परंतु येणाऱ्या चॅटबॉट्सबद्दल सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ते तयार करणारे लोक त्याच्या आवडीनिवडी यामध्ये प्रविष्ट करू शकतात. यामुळे त्यांचे विचार किंवा निर्णय एकतर्फी असू शकतात. जर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अशाच प्रकारच्या अनियंत्रित श्रेणीत चॅटबॉट्स येऊ लागले, तर सरकारे नेहमीच अडचणीत राहतील. विविध भारतीय समाजात द्वेष आणि शत्रुत्व पसरविणे ही एक सामान्य बाब ठरेल.