फोटो सौजन्य -iStock
आपण कधी कुठे फिरायला गेलो किंवा कोणता कार्यक्रम असेल तर आपण त्या क्षणाचे खास फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढतो. पण अनेकदा हे फोटो आणि व्हिडीओ आपल्याकडून चुकूत डिलीट होतात. मग अशावेळी हे फोटो आणि व्हिडीओ परत कसे मिळवायचे, असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होतो. तुमचे डिलीट झालेले फोटो आणि व्हिडीओ रिस्टोअर करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही टीप्स सांगणार आहोत. यामुळे तुम्ही चुकून डिलीट केलेले फोटो आणि व्हिडीओ तुम्हाल अगदी सहज रिस्टोअर करता येतील.
तुम्ही Google Photo Trash आणि Gallery App Trash वर जाऊन तुमच्या डिलीट केलेल्या फाइल्स रिस्टोअर करू शकता. यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. काही Android फोनमध्ये गॅलरी ॲपमध्ये बिल्ट इन ट्रॅश दिला जातो. जेव्हा तुम्ही तुमच्या फोनमधून एखादा फोटो किंवा व्हिडीओ डिलीट करता तेव्हा तो फोटो किंवा व्हिडीओ बिल्ट इन ट्रॅशमध्ये जातो. तुम्ही मोबाईलमधून डिलीट केलेले फोटो आणि व्हिडीओ बिल्ट इन ट्रॅशमधून रिस्टोअर करू शकता. तसेच तुमच्या Gallery App मध्ये Recently Deleted नावाचा एक फोल्डर असतो. या फोल्डरमध्ये जाऊन तुम्ही डिलीट केलेले फोटो रिस्टोअर करू शकता. तुम्ही तुमच्या फोनमधून डिलीट केले फोटो आणि व्हिडीओ केवळ ३० दिवसांपर्यंत Recently Deleted फोल्डरमध्ये राहतात.
तुम्ही Google Photos च्या मदतीने देखील डिलीट केलेले फोटो आणि व्हिडीओ रिस्टोअर करू शकता. पण यासाठी तुमच्या Google Photos चे बॅकअप सुरु असणे महत्त्वाचे आहे. Google Photos मध्ये लायब्ररी पर्याय उघडा आणि ट्रॅश पर्यायावर जा. येथून तुम्हाला डिलीट केलेले फोटो आणि व्हिडिओ मिळतील. येथे डिलीट केलेले फोटो आणि व्हिडिओ केवळ ६० दिवसांसाठी राहतील. तसेच तुम्ही तुमचे डिलीट झालेले फोटो आणि व्हिडीओ रिस्टोअर करण्यासाठी थर्ड पार्टी अॅप्सचा देखील वापर करू शकता. त्यामुळे आता फोन किंवा व्हिडीओ चुकून डिलीट झाले तर चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही अगदी सहज तुमचे डिलीट झालेले फोटो आणि व्हिडीओ रिस्टोअर करू शकता.






