PM Kisan Yojana: पीएम किसान योजना यादीत तुमचं नाव कसं शोधाल? ऑनलाइन पोर्टलवर कशा प्रकारे करू शकता तक्रार? जाणून घ्या सविस्तर
24 फेब्रुवारी 2024 पासून पंतप्रधान किसान योजनेचा 19 वा हफ्ता जमा करण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत देशभरातील सुमारे 10 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 22 हजार कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले आहेत. पण अजूनही असे अनेक शेतकरी आहेत, ज्यांच्या खात्यात 19 वा हफ्ता आला नाही. त्यामुळे पंतप्रधान किसान योजनेच्या यादित आपलं नाव आहे की नाही यासाठी शेतकरी गोंधळले आहेत. आता आम्ही तुम्हाला काही ऑनलाईन प्रोसेस सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही यादीत तुमचं नाव आहे की नाही हे तपासू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)
जर तुम्हाला पीएम किसान योजनेच्या 19 व्या हप्त्याचे पैसे अद्याप मिळाले नसतील, तर तुम्ही पीएम-किसानच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन तक्रार करू शकता. यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो करायच्या आहेत.
तुम्हाला पोर्टलवर तक्रार करण्यात अडचणी येत असतील तर तुम्ही शेतकरी पीएम-किसान हेल्पलाइन क्रमांक 1800-115-526 किंवा 155261 वर कॉल करून तक्रार करू शकतात. हा हेल्पलाइन क्रमांक सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत खुला असतो. यासोबतच, शेतकरी pmkisan-ict@gov.in वर ईमेलद्वारे तक्रारी करू शकतात. ईमेल पाठवताना, तुम्ही तुमचे नाव, पत्ता, आधार क्रमांक आणि बँक खात्याची माहिती यासारखी सर्व माहिती द्यावी.






