प्रतिक्षा संपली! स्वस्त POCO स्मार्टफोन्सच्या विक्रीला सुरुवात, केवळ इतक्या किंमतीत दमदार फीचर्स आणि तगडी बॅटरी
कंपनीने हार्डवेयर अपग्रेडवर अधिक फोकस करत दोन्ही नवीन स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. यामध्ये मोठी बॅटरी, हाय-रिफ्रेश-रेट वाला डिस्प्ले आणि शाओमीच्या हायपरओएस 3 चे इंटीग्रेशन पाहायला मिळणार आहे. या स्मार्टफोनचे फीचर्स, स्पेसिफेकशन्स आणि इतर माहिती आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X)
पोको सी 81 एक्स स्मार्टफोनचे 3GB + 64GB व्हेरिअंट 9,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आले आहे. पोको सी 81 स्मार्टफोनचे 4GB + 64GB व्हेरिअंट 10,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आले आहे. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर स्मार्टफोन्सची विक्री सुरु झाली आहे.
पोको सी 81 सीरीज अंतर्गत लाँच करण्यात आलेल्या या डिव्हाईसमध्ये HD+ LCD पॅनल देण्यात आला आहे. सी 81 एक्स मध्ये 6.88-इंच डिस्प्ले आहे तर सी 81 मध्ये थोडा मोठा 6.9-इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. दोन्ही डिव्हाईस 120Hz रिफ्रेश रेट सपोर्टसह लाँच करण्यात आले आहे. कंपनीने लाँच केलेल्या दोन्ही लेटेस्ट स्मार्टफोनमध्ये 4G-लिमिटेड युनिसॉक T7250 ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आला आहे. यासोबतच फोनमध्ये यूएफएस 2.2 स्टोरेज आणि एलपीडीडीआर4एक्स रॅम दिली आहे.
पोकोच्या दोन्ही डिव्हाईसमध्ये 13MP चा प्रायमरी रियर कॅमेरा दिला आहे. ज्यासोबत LED फ्लॅश देखील आहे. स्मार्टफोनच्या समोरील बाजूला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8MP चा कॅमेरा दिला आहे.
पोको सी 81 एक्समध्ये 5,200mAh बॅटरी देण्यात आली आहे. तर पोको सी 81 मध्ये थोडी मोठी 6,300mAh बॅटरी देण्यात आली आहे. दोन्ही डिव्हाईस 15W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतात.याशिवाय यामध्ये 7.5W रिवर्स चार्जिंग सपोर्ट देखील आहे.
पोको सी 81 हा हायपरओएस 3 सह अँड्रॉइड 16 वर चालतो, तर सी 81 एक्स हा अँड्रॉइड 15 वर चालतो आणि त्याला फक्त दोन ओएस अपग्रेड आणि चार वर्षांचे सुरक्षा अपडेट्स मिळतील. पोको सी 81 सनसेट गोल्ड, स्काय ब्लू आणि एलिट ब्लॅक या रंगांमध्ये उपलब्ध असेल. पोको सी 81 एक्स आईस ब्लू आणि क्रिस्टल ब्लॅक या रंगांमध्ये उपलब्ध असेल. दोन्ही डिव्हाइसमध्ये 3.5mm हेडफोन जॅक, पॉवर बटणामध्येच असलेला साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आणि 2TB पर्यंत स्टोरेज मिळते.






