फोटो सौजन्य - Social Media
या पोस्टरमध्ये मनोज बाजपेयी एका अतिशय गंभीर आणि प्रभावशाली भूमिकेत दिसत असून, त्यांच्या लूकने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘गव्हर्नर’च्या नव्या पोस्टर्समधून स्टार कास्टचाही खुलासा झाला आहे, ज्यामध्ये मनोज बाजपेयी आणि अदा शर्मा झळकणार आहेत. वेगवेगळ्या पोस्टर्समध्ये नॅशनल अवॉर्ड विजेते अभिनेते मनोज बाजपेयी यांचे विविध शेड्स पाहायला मिळतात, तसेच हे पोस्टर्स पडद्यावर दिसणाऱ्या दमदार ड्रामाची झलकही देत आहे.
जाहिरातजाहिरातView this post on Instagram
A post shared by Sunshine Pictures (@sunshinepicturesofficial)
कास्टचे चेहरे समोर येण्यासोबतच पोस्टर्समध्ये काही दमदार टॅगलाईन्सही देण्यात आल्या आहेत, पोस्टरसाठी कॅप्शन लिहीताना, “आता माझी पाळी आहे”, “I will not let India fail”, आणि “India is on the verge of bankruptcy, he saw it coming.” या सर्व टॅगलाईन्स भारताच्या आर्थिक संकटाच्या कठीण काळाकडे निर्देश करतात. त्यामुळे या पोस्टरवरुन आता चित्रपटात मनोज बाजपेयी नेमकी कशी भूमिका साकारणार, याबद्दल उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. हे एक युद्ध होतं. यात कोणतीही सेना नव्हती. फक्त एक माणूस… ज्याने देशाला कोसळण्यापासून वाचवण्याचा निर्धार केला होता. असा शब्दांत पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे या चित्रपटात नेमकं काय पहायला मिळणार आहे? कोणत्या अंदाजात चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे याबाबत सगळ्यांमध्येच उत्सुकता आहे.
विपुल अमृतलाल शाह प्रॉडक्शनचा ‘गव्हर्नर: द सायलेंट सेव्हियर’ हा चित्रपट सनशाईन पिक्चर्स प्रस्तुत करत आहे. विपुल अमृतलाल शाह निर्मित आणि चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित या चित्रपटाचे सह-निर्माते आशिन ए. शाह आहेत. या चित्रपटाची कथा सुवेंदु भट्टाचार्यजी, सौरभ भरत, रवि असरानी आणि स्वतः विपुल अमृतलाल शाह यांनी लिहिली आहे. जावेद अख्तर यांच्या गीतांना अमित त्रिवेदी यांनी संगीत दिले आहे. ‘गव्हर्नर: द सायलेंट सेव्हियर’ हा चित्रपट 12 जून 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.






