Instagram वर व्ह्युज आणि फॉलोवर्स वाढत नाही? ही सेटिंग अनेबल करताच संपेल तुमचं टेंशन
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर फोटो आणि रिल्स शेअर करून आपण देखील इतरांसारखं फेमस व्हाव, असं अनेकांना वाटतं. यासाठी युजर्स खूप मेहनत देखील घेतात, जेणेकरून त्यांनी शेअर केलेल्या रिल्सला चांगले व्ह्यूज मिळतील आणि फॉलोअर्स वाढतील. पण खूप मेहनत करूनही जर व्ह्यूज आणि फॉलोअर्स वाढले नाहीत तर लोक त्यांची मेहनत व्यर्थ समजतात. अशावेळी अनेकजण निराश होतात. पण तुम्हाला टेंशन घेण्याची गरज नाही, तुम्ही इंस्टाग्राममधील एका सोप्या सेटिंगच्या मदतीने इंस्टाग्रामवर रिल्स आणि फॉलोवर्स वाढवू शकता.
Tech Tips: WhatsApp Calls रेकॉर्ड करायचे आहेत? 90 टक्के लोकांना माहीत नाही ही सोपी पद्धत
इंस्टाग्रामवर तुमचे व्ह्यूज आणि फॉलोअर्स वाढत नसल्यास काळजी करण्याची गरज नाही. आता आम्ही तुम्हाला इंस्टाग्रामच्या अशा काही फीचर्सबद्दल सांगणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही इंस्टाग्रामवर व्ह्यूज आणि फॉलोअर्स अगदी सहज वाढवू शकता. यासाठी, तुमच्या इंस्टाग्रामवर कंटेंट पोस्ट करण्यापूर्वी तुम्हाला सेटिंगमध्ये काही बदल करावा लागणार आहे. सेटिंगमधील हा बदल तुम्हाला इंस्टाग्रामवर व्ह्यूज आणि फॉलोअर्स वाढवण्यासाठी मदत करणार आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
इंस्टाग्रामवर हाय क्वालिटी कंटेट अनेकदा पसंत केली जाते आणि ती तुमची व्ह्यूज आणि फॉलोअर्स वाढविण्यात देखील मदत करते. हे सेटिंग चालू करून, तुम्ही तुमचे व्हिडीओ आणि फोटो हाय क्वालिटीमध्ये पोस्ट करू शकता, जी तुमच्या फॉलोवर्सना आवडू शकते.
तुमचं Instagram Account सस्पेंड झालंय? नो टेंशन, या सोप्या पद्धतीने होईल रिकव्हर
जेव्हा तुम्ही रील पोस्ट करणार असाल, तेव्हा त्याच्या ऑडिओ पर्यायावर जा. येथे तुम्हाला ऑडिओला पुन्हा नाव देण्याचा पर्याय दाखवला जाईल. Rename Audio वर क्लिक करा आणि ऑडिओच्या नावात Instagram Tips And Marketing लिहा आणि डन करा. असे केल्याने इतर कोणत्याही वापरकर्त्याचे नाव तुमच्या रीलवर दिसणार नाही. जर कोणी तुमचा ऑडिओ पाहिला आणि त्यावर रील बनवला तर तो तुमची रिच वाढेल.
तुम्ही नेहमीच ट्रेंडिंग कंटेंट तयार केला पाहिजे, कारण वापरकर्त्यांना फक्त ट्रेंडिंग काय आहे ते पाहणे आवडते. म्हणून, ट्रेंडवर निश्चितपणे लक्ष केंद्रित करा. व्हिडिओ गुणवत्ता आणि एडिटिंगकडे देखील लक्ष द्या आणि एक जबरदस्त कॅप्शन जोडा.