Diwali 2025: यंदाच्या दिवाळीत फोनलाही द्या फेस्टिव्ह टच, तुमच्या घरासह फोनला देखील करा क्लिक, टेंशन होईल कायमचं दूर
फोनची बाहेरून स्वच्छता आपण नेहमीच करतो. पण आता फोनची आतून स्वच्छता करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत तुम्ही देखील तुमच्या घरासोबत फोन देखील स्वच्छ करा आणि यासाठी आता आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमचा फोन अगदी नव्यासारखा चमकवू शकता. ही स्वच्छता केवळ बाहेरूनच नाही तर फोनच्या आतून देखील होणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
काही वेळा आपण एखाद्या कामासाठी फोनमध्ये ॲप्स डाऊनलोड करतो. पण एक दोनदा वापर केल्यानंतर या ॲप्सचा वापर केला जात नाही. परंतु हे ॲप्स फोनमध्ये तसेच राहतात आणि यामुळे फोनचा स्टोरेज वाढतं. तसेच तुमचा डेटा देखील या ॲप्सकडे जात राहतो. यामुळे आता वेळ आली आहे की तुम्ही हे ॲप डिलीट करा आणि ज्यामुळे तुमच्या फोनचं स्टोरेज देखील रिकामं होईल आणि फोन हँग देखील होणार नाही.
काही काळ वापर केल्यानंतर फोनमध्ये अशा अनेक फाईल स्टोअर केल्या जातात ज्यांची गरज नसते. आता तुम्ही या फाइल्स डिलीट करून तुमच्या फोनचं स्टोरेज रिकामं करू शकता. ज्यामुळे फोनचं फंक्शनिंग अगदी स्मूथ होईल. स्क्रीन शॉट, अनेक फोटोज, व्हिडिओज इत्यादी डिलीट करून तुम्ही तुमच्या फोनचं स्टोरेज रिकामं करू शकता.
सायबर हल्ल्यांच्या वाढत्या घटनांमुळे अनेक युजर्स नियमित त्यांचे पासवर्ड बदलत असतात. त्यामुळे तुम्ही सायबर गुन्हेगारांपासून सुरक्षित राहता आणि तुमचा डेटा लिक होत नाही. दिवाळीच्या निमित्ताने तुम्ही फोनची स्वच्छता केल्यानंतर तुमच्या सोशल मीडिया अकाउंटचे पासवर्ड देतील बदलू शकता. यामुळे तुम्ही सोशल मीडिया अकाउंट अधिक सुरक्षित राहतील आणि सायबर गुन्हेगारांपासून तुमची सुरक्षा अधिक मजबूत होईल. पासवर्ड बदलताना तुम्ही टू फॅक्टर ऑथेंटिकेशन देखील इनेबल करू शकता.
सायबर गुन्हेगारांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी तुम्हाला फोन आणि फोनमधील अॅप्स वेळोवेळी अपडेट करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. सायबर गुन्हेगार तुमच्यावर हल्ला करून तुमचा डेटा लिक करू शकतात. अशा परिस्थितीत तुमच्या फोनची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची असते. तुमची सुरक्षा कायम ठेवण्यासाठी जारी केले जाणारे अपडेट्स वेळोवेळी इन्स्टॉल अत्यंत महत्त्वाचं आहे.






