Christmas–New Year सेलच्या नावाखाली सुरु आहे स्कॅम! सुरक्षित राहण्यासाठी लक्षात ठेवा 'या' महत्त्वाच्या टिप्स
Flex by Google Pay: गुगलने भारतात लाँच केलं Credit Card! असे आहेत खास फीचर्स, जाणून घ्या सविस्तर
जर तुम्ही ऑनलाईन शॉपिंग केली नसेल तरी देखील तुम्हाला पॅकेज ट्रॅकिंग कोड किंवा रिफंड ओटीपीचा मेसेज आला असेल तर सावध राहा. जर तुम्ही या मेसेजला रिप्लाय केला तर किंवा तुमचा कार्ड नंबर शेअर केला तर तुमच्या अडचणी वाढू शकतात. यामुळे नेहमी शिपिंग कंपनीकडून आलेल्या अधिकृत मेसेजवरच विश्वास ठेवा. (फोटो सौजन्य – Pinterest)
जर सणांच्या काळात तुम्हाला एखाद्या अनोळखी नंबरवरून एखाद्या जुन्या मित्राचा कॉल आला कर सावध व्हा, ही स्कॅमर्सची नवीन पद्धत आहे. AI जेनरेटेड डीपफेकद्वारे स्कॅमर्स लोकांची फसवणूक करून त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात.
सिक्योरिटी एक्सपर्टने सल्ला दिला आहे की, ऑनलाईन शॉपिंगवेळी घाई केल्यास किंवा लक्ष न दिल्यास तुम्ही अडचणीत येऊ शकता. यामुळे काळजीपूर्वक आणि वेळ देऊन शॉपिंग करणं अत्यंत गरजेचं आहे. याशिवाय जर तुम्ही ऑनलाईन शॉपिंग करणार नसाल तर सणांच्या काळात नोटिफिकेशन बंद ठेवा, ज्यामुळे तुम्ही स्कॅमर्सपासून तुमची सुरक्षा करू शकता.
एखाद्या वस्तूवर तुम्हाला गरजेपेक्षा फार जास्त डिस्काऊंट ऑफर केलं जात असेल तर सावध राहा. तथापि, डिस्काऊंट खरे आहे की नाही हे ठरवण्यासाठी तुम्ही सॉफ्टवेअर वापरू शकता. सायबर सुरक्षा कंपन्या या उद्देशासाठी स्कॅम डिटेक्टर देतात. ज्यामुळे स्कॅमर्सपासून यूजर्सची सुरक्षा होऊ शकेल आणि त्यांची फसवणूक देखील होणार नाही.
जर तुमचा कार्ड नंबर चोरीला गेला किंवा तुम्ही बनावट वेबसाइटवर क्लिक केले तर तुम्ही तुमचे क्रेडिट कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी ते ब्लॉक करू शकता.
Ans: ऑनलाईन खरेदीच्या नावाखाली फसवणूक करणे म्हणजे शॉपिंग स्कॅम. यात फेक वेबसाइट्स, खोट्या ऑफर्स, किंवा बनावट कॉल/मेसेजद्वारे पैसे किंवा वैयक्तिक माहिती चोरण्यात येते.
Ans: या काळात मोठ्या सवलती, लिमिटेड ऑफर्स आणि घाईची मानसिकता याचा फायदा घेऊन फसवणूकदार अधिक सक्रिय होतात.
Ans: URL मध्ये चुका, अतिशय मोठे डिस्काउंट, HTTPS नसलेली साइट, संपर्क माहितीचा अभाव आणि सोशल मीडियावरून आलेल्या लिंक हे फेक वेबसाइटचे संकेत आहेत.






