Instagram Update: आता लहान मुलं नाही पाहू शकणार सोशल मीडियावर 'अश्लील कंटेट'! Instagram ने लाँच केलं नवीन फीचर
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामने भारतात एक नवीन फीचर लाँच केलं आहे. टीन अकाउंट्स असं या फीचरचं नाव असून हे फीचर लहान मुलांसाठी रिलीज करण्यात आलं आहे. हल्ली सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अश्लील कंटेट असलेले व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. त्यामुळे मुलांच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होत असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे याच सगळ्याच विचार करून आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामने एक नवीन फीचर लाँच केलं आहे, ज्यामुळे लहान मुलं आता सोशल मीडियावर अश्लील कंटेट पाहू शकणार नाहीत.
मोदी सरकार करणार DeepSeek चा पर्दापाश! सुरु झाली चौकशी, लवकरच जगासमोर येणार चीनी AI चं काळ सत्य
इंस्टाग्रामने लाँच केलेलं हे फीचर 16 वर्षांखालील वापरकर्त्यांसाठी लाँच करण्यात आलं आहे. 16 वर्षांखालील इंस्टाग्राम युजर्सची सुरक्षितता आणि गोपनीयता सुनिश्चित करण्यासाठी नवीन फीचर डिझाइन केले आहे. कंपनीने पाच महिन्यांपूर्वी अमेरिका, यूके, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडामध्ये हे फीचर लाँच केले होते आणि आता ते भारतीय वापरकर्त्यांसाठी देखील उपलब्ध झाले आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
डिफॉल्ट प्राइवेट अकाउंट – टीन अकाउंट ऑटोमॅटिकली प्राइवेट मोडमध्ये सेट केली जातात, ज्यामुळे अज्ञात वापरकर्त्यांना त्यांच्या पोस्ट दिसणार नाहीत.
मर्यादित मेसेजिंग पर्याय – टीन अकाउंट वापरकर्ते फक्त ते आधीच फॉलो करत असलेल्या लोकांकडूनच मेसेज प्राप्त करू शकतील.
सेंसिटिव कंटेंटची लिमिटेशन – टीन अकाउंट्सना सर्वात अधिक रेस्ट्रिक्टिव कंटेंट फिल्टरिंग सेटिंग्स अंतर्गत ठेवले जाते, ज्यामुळे त्यांना संवेदनशील किंवा अनावश्यक कंटेंट पाहण्यापासून रोखले जाते.
डेली यूसेज लिमिट – जर वापरकर्ता 60 मिनिटांपेक्षा जास्त काळ अॅप वापरत असेल, तर त्याला/तिला अॅप बंद करण्यास सांगणारी नोटिफिकेशन मिळेल.
स्लीप मोड (Sleep Mode)- रात्री 10 ते सकाळी 7 वाजेपर्यंत स्लीप मोड चालू राहील, जो नोटिफिकेशन आणि डीएम म्यूट करेल.
टॅगिंग आणि मेंशनची लिमिट- टीन अकाउंट यूजर्सना फक्त ते आधीच फॉलो करत असलेले लोकच टॅग किंवा मेंशन करू शकतात. ज्यामुळे त्यांची सुरक्षितता टिकून राहण्यासाठी मदत होणार आहे.
हिडन वर्ड्स (Hidden Words) फीचर– हे वैशिष्ट्य एक अँटी-बुलिंग टूल म्हणून काम करते जे अपमानास्पद शब्द, इमोजी आणि फ्रेज ऑटोमॅटिकली ब्लॉक करेल.
अकाउंट सेटिंग्जवर पालकांची परवानगी – 16 वर्षांखालील मुलांना सेटिंग्ज बदलायची असल्यास पालकांची परवानगी आवश्यक असेल.
मेसेजिंग सुपरविजन- पालक गेल्या 7 दिवसांत पाठवलेल्या मॅसेजची यादी पाहू शकतील, परंतु मेसेजमधील मजकूर वाचू शकणार नाहीत.
तब्बल 18 वर्षांनंतर बंद होतंय Apple iPhone चं हे फीचर! नव्या लुकमध्ये करणार एंट्री
डेली टाइम लिमिट – पालक मुलांसाठी इंस्टाग्रामची यूज लिमिट सेट करू शकतात जेणेकरून मुलं जास्त काळ अॅपचा वापर करणार नाहीत.
स्पेसिफिक टाइमवर अॅक्सेस ब्लॉक – पालक विशिष्ट वेळी, जसे की रात्री, मुलांचा इन्स्टाग्रामवरील अॅक्सेस ब्लॉक करू शकतात.