होळीचे तिकीट बुक करताना डाऊन झाला IRCTC; सोशल मीडियावर युजर्सच्या तक्रारींचा पाऊस, अखेर रेल्वेनेचं उत्तर दिलं
12 मार्च रोजी आज IRCTC आज वेबसाईट आणि अॅप आज अचानक डाऊन झाला आहे. आज सकाळी तात्काळ तिकीट बुक करताना युजर्सना ही समस्या उद्भवली. होळीच्या निमित्ताने लोकं फिरायला आणि गावाला जाण्यासाठी तिकीट बुक करत आहेत. पण अशातच IRCTC अचानक डाऊन झाल्याने रेल्वे तिकिटे बुक करणाऱ्या प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे. वेबसाईट आणि अॅप डाऊन होताच युजर्सनी सोशल मीडियावर तक्रार करण्यास सुरुवात केली.
यापूर्वी देखील अनेकवेळा IRCTC डाऊन झाला आहे. आता देखील पुन्हा हीच समस्या उद्भवल्याने युजर्सनी हैराण होऊन सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक्सवर तक्रारींचा पाऊल सुरु केला. मात्र आता युजर्सच्या या तक्रारींना रेल्वेने उत्तर दिलं आहे. युजर्सनी एक्सवर शेअर केलेल्या पोस्टवर IRCTC ने कमेंट केली असून त्यांनी वेबसाईट आणि अॅपमध्ये कोणतीही समस्या नसल्याचं म्हटलं आहे. मात्र तरी देखील युजर्सना वेबसाईट आणि अॅप वापरण्यात काही अडचणी निर्माण होत आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
IRCTC वेबसाईट आणि अॅप अचानक डाऊन झाल्याने रेल्वे तिकिटे बुक करणाऱ्या प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे. अनेक युजर्सनी तक्रार केली आहे की IRCTC ची वेबसाइट डाउन आहे आणि त्यांना तत्काळ तिकिटे बुक करण्यात अडचणी येत आहेत. X वरील अनेक लोकांनी अॅप आणि वेबसाइट डाउन झाल्याची तक्रार करत याचा स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे. तथापि, IRCTC ने अॅप आणि वेबसाइटमध्ये कोणतीही समस्या असल्याचे नाकारले आहे. IRCTC ने त्यांच्या अधिकृत हँडलवरून उत्तर दिले की वेबसाइट योग्यरित्या काम करत आहे आणि बुकिंगमध्ये कोणतीही अडचण नाही.
Trying to book tickets from last 2 days,
Tickets Booking app IRCTC Connect are not working, while opening app popup massage showing (Unable to connect with the server. Check your internet connection. …)
Please fix this issue @RailwayNorthern @IRCTCofficial @RailMinIndia pic.twitter.com/E4DQ4Z3Iac
— Rishabh Vishwakarma (@rishabh_yahoo1) March 12, 2025
Is IRCTC server down? @IRCTCofficial
— Divergent (@Aneel2941985) March 11, 2025
App not working
Website not workingThank you @RailMinIndia @RailwaySeva for this amazing service 👍🏻 pic.twitter.com/iNTxRicQGf
— ZEESHAN SHAIKH (@OYEZEEzee) March 12, 2025
आउटेज ट्रॅकिंग वेबसाइट डाउनडिटेक्टरनुसार, IRCTC सेवांमध्ये व्यत्ययाबद्दलच्या तक्रारी सकाळी 8 वाजल्यापासून येऊ लागल्या आणि सकाळी 8.20 वाजता त्यात मोठी वाढ दिसून आली. येथे तक्रार करणाऱ्या बहुतेक युजर्सनी सांगितले की त्यांना अॅपमध्ये समस्या येत आहेत, तर काहींनी वेबसाइट डाउन असल्याचे सांगितले. भारतीय रेल्वेचे तात्काळ बुकिंग सकाळी 10 वाजता सुरू होते. अशा परिस्थितीत सर्व्हर लवकर डाउन झाल्यामुळे लोकांच्या समस्या वाढल्या. देशाच्या अनेक भागांमधून IRCTC सर्व्हर डाउन असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. यामध्ये दिल्ली, मुंबई, कोलकाता, पुणे आणि चेन्नई इत्यादींचा समावेश आहे.
HMD Barbie Flip Phone: Nokia लवकरच भारतात लाँच करणार पिंक फोन, लाँचपूर्वीच फीचर्स लीक!
एका युजरच्या तक्रारीला उत्तर देताना, IRCTC ने सांगितले की वेबसाइट उत्तम प्रकारे काम करत आहे आणि बुकिंगमध्ये कोणतीही अडचण येत नाही. काही तात्पुरती समस्या असू शकते. ब्राउझिंग इतिहास आणि कॅशे साफ केल्यानंतर कृपया पुन्हा प्रयत्न करा.
IRCTC सर्व्हर डाउन असल्याची तक्रार लोकांनी करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या काही महिन्यांत प्रवाशांना या समस्येचा अनेक वेळा सामना करावा लागला आहे.