Tech Tips: तुमचं नाव आणि फोटो वापरून कोणी दुसरच चालवतंय Instagram Account? ताबडतोब करा हे काम
सध्याची तरूण पिढी प्रत्येक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यांचं अकाउंट तयार करते. यासाठी युजर त्यांचे नाव आणि फोटो वापरतात. अशा अनेक घटना घडताना त्यामध्ये खोट अकाउंट बनवून इतर युजर्सचं नाव आणि फोटो वापरला जातो. या अकाउंटमधून चुकीची कामे केली जाण्याची देखील शक्यता असते. तुमचे देखील नाव आणि फोटो वापरून कोणी इंस्टाग्राम अकाउंट तयार केला आहे का?
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर कोणी तुमचं नावाने फोटो वापरून खोटं अकाउंट तयार केला असेल तर ही अतिशय गंभीर बाब असू शकते. या अकाउंटमधून आणि चुकीची कामे केली जाण्याची देखील शक्यता आहे. याशिवाय अशा खोटे अकाउंटमुळे तुमचे कुटुंबीय आणि मित्रांमध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो. अशा परिस्थितीत महत्त्वाची पावले उचलन गरजेचे आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
काही इंस्टाग्राम पेज केवळ फॅन पेज किंवा पॅरोडी पेज असतात. या पेजेसवर संबंधित व्यक्तीबाबत सर्व अपडेट शेअर केले जातात. मात्र हे संबंधित व्यक्तीचे अधिकृत पेज नसते. परंतु जर एखादे खाते तुमचे नाव, फोटो, बायो किंवा कोणत्याही वैयक्तिक माहितीचा गैरवापर करत असेल आणि संबंधित अकाऊंट तुमचे असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करत असेल, तर ती “तोतयागिरी” मानली जाते. अशा परिस्थितीत कठोर पावले उचलणे अत्यंत गरजेचे आहे
तुमच्या नावाने वापरल्या जाणारे बनावट प्रोफाइलची तक्रार करण्याचे तुमच्याकडे दोन मार्ग आहेत एक म्हणजे ॲपवरून दुसरा म्हणजे वेबसाईटवरून
जर तुम्हाला इंस्टाग्रामवर तुमचे बनावट अकाऊंट दिसेल तर सर्वात आधी तुमच्या कुटुंबीय मित्र आणि फॉलोवर्सना याबाबत माहिती द्या. संबंधित बनावट अकाउंटवर जोपर्यंत कारवाई केली जात नाही यातोपर्यंत प्रयत्न करत आहे.