iphone (फोटो सौजन्य- pinterest)
आयफोन हे सर्वानाच पाहिजे असते आणि अनेक लोकांकडे आयफोन आपल्याला दिसून पडते. स्मार्टफोन्स पैकी हा सर्वात जास्त पसंत करणारा फोन आहे. लोक याला आवडीने घेत आहे. परंतु जेव्हा आपण आयफोन घेतो तेव्हा हा फोन डुप्लिकेट तर नाही असा विचार सतत सुरु असतो. विशेषतः जेव्हा ऑफलाईन आयफोन घेतो. ऑनलाईन पण असा फ्रॉड होण्याची भीती असते. जर तुम्ही ऑनलाइन किंवा ऑफलाइन आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा अलीकडेच नवीन आयफोन घेतला असेल तर तुम्ही या ५ पद्धतीने काही मिनटात माहिती करू शकता की तुमचा आयफोन डुप्लिकेट आहे की नाही. या पद्धतीने तुम्ही मोठ्या फ्रॉडशी वाचू शकता. चला जाणून घेऊयात या बाबतीत.
इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस चार्ज करतांना घ्या ‘ही’ काळजी; चुकीची पद्धत ठरू शकते धोकादायक!
Siri ला टेस्ट करून माहिती करू शकता
डुप्लिकेट आयफोन्समध्ये सिरी व्यवस्थित काम करत नाही असं पाहण्यात आलं आहे किंवा त्याचा रिस्पॉन्स खूप खराब देतो. मूळ आयफोनमध्ये, सिरी खरोखर चांगले काम करते, ज्यामुळे तुम्ही फोनला स्पर्श न करताही बरेच काही करू शकता. Siri, can you play music? असे अनेक प्रश्न सीरीला विचारून टेस्ट करू शकता. जर या कंडिशनमध्ये सिरी प्रतिसाद देत नसेल किंवा ऍक्टिव्ह नसेल होत तर होऊ शकते तुमचं अफोन डुप्लिकेट आहे.
iPhone Lookup वेबसाइटवरून तपासा
तुमचा आयफोन डुप्लिकेट आहे की नाही हे तपासण्यासाठी, तुम्ही अॅपलच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन आणि तुमच्या आयफोनचा सिरीयल नंबर टाकून देखील ते तपासू शकता. यासाठी तुम्हाला गुगलवर जाऊन Check Coverage – Apple असे लिहावे लागेल आणि पहिल्या वेबसाइटवर जावे लागेल. येथे सिरीयल नंबर टाकल्यानंतर, जर वेबसाइटवर ‘Invalid Serial Number’ असे लिहिले असेल तर समजून घ्या की काहीतरी चूक आहे. तुमच्या फोनचा सिरीयल नंबर तपासण्यासाठी, तुम्हाला सेटिंग्जमध्ये जावे लागेल, नंतर जनरल, नंतर अबाउट करावे लागेल आणि नंतर तेथून सिरीयल नंबर कॉपी करावा लागेल.
हे दोन अॅप्स देखील तुम्ही तपासू शकता.
अनेक डुप्लिकेट iPhones मध्ये compass, Gyroscope किंवा TrueDepth सारखे कॅमेरा फीचर्स काम नाही करत किंवा फोन मध्ये हे फीचर्स बघायला सुद्धा नाही मिळत. अशा परिस्थितीत, तुम्ही अॅप स्टोअरवरून ‘Gyroscope Test’ किंवा ‘Sensor Test’ अॅप डाउनलोड करून हे शोधू शकता.
तुमचा फोन येथे कनेक्ट करा
आयफोन डुप्लिकेट आहे कि नाही हे माहिती करण्यासाठी आयफोनला कंप्यूटरशी कनेक्ट करून चेक करू शकता. याच्यासाठी तुम्ही तुमच्या फोनला iTunes / Finder शी कनेक्ट करून बघा. जर डिव्हाईस iTunes किंवा Finder मध्ये डिटेक्ट नाही होत असेल तर हा आयफोन डुप्लिकेट असू शकते. कारण वास्तविक आयफोन मिनिटात Sync होतो.
‘Measure’ अॅप वापरून टेस्ट करू शकता
तुम्ही ‘Measure’ अॅपच्या मदतीने तुम्ही जाणून घेऊ शकता तुमचा आयफोन डुप्लिकेट आहे कि नाही. Appleचा हा AR अॅप केवळ मूळ आयफोन मध्येच व्यवस्थित काम करतो. अश्यात जर अॅप चालत नसेल किंवा आयफोन मध्ये आधीपासून इंस्टॉल नसेल तर आयफोन डुप्लिकेट असू शकतो.