Oppo चे हे दोन तगडे स्मार्टफोन लवकरच होणार लाँच, हटके फीचर्स वाचून तुम्हीही व्हाल अवाक!
स्मार्टफोन कंपनी Oppo त्यांचे दोन नवीन स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीचा एक स्मार्टफोन आज 10 एप्रिल रोजी लाँच केला जाणार आहे. तर एका स्मार्टफोनची लाँच डेट अद्याप कनर्फ्म झालेली नाही. आज 10 एप्रिल रोजी Find X8 Ultra स्मार्टफोन Oppo होम मार्केट चीनमध्ये लाँच केला जाणर आहे. तर Oppo K13 5G स्मार्टफोनच्या लाँच डेटबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली आहे. मात्र हा स्मार्टफोन देखील लवकरच बाजारात लाँच केला जाणार आहे, असं सांगितलं जात आहे.
Oppo K13 5G च्या लाँचिंगबाबत माहिती देण्यासाठी कंपनीने बुधवारी एक प्रेस रिलीज जारी केलं आहे. यामध्ये सांगण्यात आलं आहे की आगामी स्मार्टफोन Oppo K13 5G भारतीय बाजारात लाँच केला जाणार असून तो फ्लिपकार्टद्वारे खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. कंपनीचा हा स्मार्टफोन MediaTek च्या Dimensity 8400 चिपसेटने सुसज्ज असणार आहे. हा स्मार्टफोन Oppo K12 चे अपग्रेड मॉडेल असल्याचं सांगितलं जात आहे, जे Snapdragon 7 Gen 3 प्रोसेसरसह लाँच करण्यात आले होते.
OPPO K13 5G launching soon in India. pic.twitter.com/NkkLDbcA9H
— Mukul Sharma (@stufflistings) April 9, 2025
स्मार्टफोनची लँच डेट अद्याप अधिकृतपणे जाहिर करण्यात आली नाही. मात्र समोर आलेल्या लिक्समध्ये असं सांगितलं जात आहे की, हा स्मार्टफोन 24 एप्रिल रोजी लाँच केला जाऊ शकतो. स्मार्टफोनचे अनेक स्पेसिफिकेशन्स देखील लाँचिंगपूर्वी समोर आले आहेत. याशिवाय स्मार्टफोनच्या किंमतीतबाबत देखील असा अंदाज लावला जात आहे की, या आगामी स्मार्टफोनची किंमत 20 हजार रुपयांहून कमी असणार आहे. मात्र कंपनीने अद्याप याबाबत अधिकृतपणे घोषणा केली नाही.
Oppo K13 5G स्मार्टफोनमध्ये 7,000mAh बॅटरी दिली जाण्याची शक्यता आहे, जी 80W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनमध्ये 6.5-इंच फुलएचडी+ AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. शिवाय हा स्मार्टफोन 120Hz रिफ्रेश रेटसह लाँच केला जाण्याची शक्यता आहे. या आगामी स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर, आईआर ब्लास्टर टेक्नोलॉजी आणि वॉटर एंड डस्ट रेसिस्टेंटसाठी IP69 रेटिंगसह येतो.
कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर, या स्मार्टफोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. डिव्हाईसमध्ये 50 मेगापिक्सल प्राइमरी कॅमेरा सेंसर आणि 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा देखील दिला जाऊ शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरासह येऊ शकतो.
Oppo Find X8 Ultra स्मार्टफोन आज 10 एप्रिल रोजी चीनच्या होम मार्केटमध्ये लाँच केला जाणार आहे. या फोनसोबतच कंपनी फाइंड एक्स८एस आणि फाइंड एक्स८एस+ स्मार्टफोन, वॉच एक्स२ मिनी स्मार्टवॉच, पॅड ४ प्रो टॅबलेट आणि एन्को फ्री ४ इयरबड्स बाजारात लाँच करेल. Oppo Find X8 Ultra स्मार्टफोनचे डिझाईन काही दिवसांपूर्वीच सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर करण्यात आले आहे. शिवाय कंपनीने लाँचिंगपूर्वीच या स्मार्टफोनचे काही स्पेसिफिकेशन देखील शेअर केले आहेत. या स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम Snapdragon 8 Elite चिपसेट देण्यात आला आहे. शिवाय चॉर्जिंगसाठी 6100mAh दिली जाणार आहे. स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सलचा क्वाड रियर कॅमेरा सेटअप देखील असणार आहे.