Motorola ने उडवली स्मार्टफोन कंपन्यांची झोप! स्वस्तात लाँच केला Stylus Pen सपोर्टवाला स्मार्टफोन, असे आहेत फीचर्स
टेक कंपनी Motorola इतर स्मार्टफोन कंपन्यांची झोप उडवण्यासाठी सज्ज झाला आहे. Motorola ने प्रिमियम फीचर्ससह नवीन बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनने भारतात Motorola Edge 60 Stylus या नावाने एंट्री केला आहे. कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन Stylus Pen सपोर्टसह लाँच करण्यात आला आहे. म्हणजेच आता बजेट किंमतीत तुम्हाला Stylus Pen चा देखील वापर करता येणार आहे.
कंपनीने लाँच केलेल्या या नवीन स्मार्टफोनमध्ये एक खास बिल्ट-इन स्टायलस आहे ज्याच्या मदतीने तुम्ही पेंटिंग्ज काढू शकता. बजेट किंमतीत Stylus Pen सपोर्टसह येणारा हा पहिला स्मार्टफोन आहे. त्यामुळे आता कंपनीचा हा नवीन स्मार्टफोन सर्वच टेक कंपन्यांना टक्कर देण्यासाठी सज्ज झाला आहे. या स्मार्टफोनची किंमत आणि इतर स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – X)
भारतात Motorola Edge 60 Stylus ची किंमत 8GB + 256GB रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटसाठी 22,999 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीने हा फोन पँटोन जिब्राल्टर सी आणि पँटोन सर्फ द वेब या दोन रंगांच्या पर्यायांमध्ये सादर केला आहे. तुम्ही 23 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजल्यापासून फ्लिपकार्ट, मोटोरोला इंडिया वेबसाइट आणि रिटेल स्टोअर्समधून हे डिव्हाइस खरेदी करू शकाल.
Sketch it. Style it. Show it off — all from one sleek canvas. Meet the Motorola Edge 60 STYLUS – made to move with your ideas, and match your every mood.
Sale starts from 23th Apr’25 on Flipkart | https://t.co/azcEfy1Wlo | leading retail stores.— Motorola India (@motorolaindia) April 15, 2025
कंपनीने सांगितलं आहे की, या डिव्हाइसवर विशेष सवलत देखील मिळवू शकता जिथे ग्राहक फ्लिपकार्टवर 1,000 रुपयांचे एक्सचेंज डिस्काऊंट मिळवू शकतात, ज्यामुळे हँडसेटची किंमत 21,999 रुपयांपर्यंत कमी होते. अॅक्सिस बँक आणि आयडीएफसी क्रेडिट कार्ड वापरून पूर्ण स्वाइप व्यवहारांवर 1,000 रुपयांची सूट देखील असेल. दरम्यान, रिलायन्स जिओ यूजर्स फोन खरेदीवर 2,000 रुपयांपर्यंत कॅशबॅक आणि शॉपिंग, फ्लाइट आणि हॉटेल बुकिंग डीलसह 8,000 रुपयांचे अतिरिक्त फायदे देखील मिळवू शकतात. म्हणजेच हा स्मार्टफोन खरेदी करणं अत्यंत फायद्यांच ठरणार आहे.
फोनमध्ये 6.67-इंचाचा 1.5K pOLED डिस्प्ले आहे ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz , टच सॅम्पलिंग रेट 300Hz आणि पीक ब्राइटनेस 3,000nits आहे.
हा नवीन स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 7s जेन 2 प्रोसेसरने सुसज्ज आहे, ज्यामध्ये 8GB LPDDR4X रॅम आणि 256GB यूएफएस 2.2 ऑनबोर्ड स्टोरेज आहे.
हे डिव्हाइस अँड्रॉइड 15-आधारित हॅलो UI स्किनसह येते आणि त्याला दोन वर्षांचे OS अपग्रेड आणि तीन वर्षांचे सुरक्षा अपडेट मिळतात.
या डिव्हाइसमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा आहे ज्यामध्ये 50 मेगापिक्सेल सोनी लिटिया 700सी प्रायमरी सेन्सर, 13 मेगापिक्सेल अल्ट्रावाइड सेन्सर आणि 3 इन 1 लाईट सेन्सर आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 32 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे.
फोनमध्ये 5,000mAh बॅटरी आहे जी 68W वायर्ड आणि 15W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह येते. स्मार्टफोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
अॅडोब डॉक स्कॅन फोनमध्ये एकत्रित केले आहे. या हँडसेटमध्ये डॉल्बी अॅटमॉस सपोर्टसह ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स आहेत.