WhatsApp Web Scroll Issue: जगभरात सर्वात मोठ्या प्नमाणात वापरला जाणारा सोशल मीडिया म्हणजे Whats app. कॉर्पोरेट वर्क असो किंवा इतर कोणतीही कामं whtas app web चा सर्वात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. याच Whats app web चा आज सकाळपासून मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झाल्याने युजर्सना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सकाळपासून Whats app web ला स्क्रोलींगसाठी मोठी समस्या होत असल्याचं दिसून आलं आहे.
सोशल मीडियावर या समस्येबाबत तक्रारी युजर्सकडून करण्यात आल्या आहेत. Whats app web युजर्सने याबाबत ट्विटरवर या समस्येबद्दल पोस्ट केल्या आहेत. अनेकांनी ट्विटरवर केलेल्या तक्रारीत असं म्हटलं आहे की Whats app web चे स्क्रोल फीचर योग्यरित्या काम करत नाही. web scrolling ला मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम येत असल्याचं सांगितलं गेलं आहे. सकाळपासून हा प्रॉब्लेम होत होता.
सुरुवातीला काही युजर्सना असं वाटत होतं की, लॅपटॉप किंवा पीसीचा काही टेकनिकल प्रॉब्लेम असू शकतो त्यामुळे Whats app web स्क्रोलिंगला बऱ्याच समस्या येत असाव्यात. मात्र काही वेळानंतर असं लक्षात आलं की, Whats app web server च्या प्रॉब्लेममुळे हा त्रास होत आहे.
“Is it something wrong with wa web? I can’t scroll up or down.” तर दुसऱ्या युजरने असं म्हटलं की, “Can you scroll through WhatsApp web?” असे प्रश्न देखील विचारले आहेत.
Whats app web चा वापर विशेषतः ऑफिसमध्ये आणि काम करणाऱ्या लोकांमध्ये जास्त केला जातो. स्क्रोल न होण्याची समस्येमुळे कामात मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण झाले आहेत. यावर chat history किंवा महत्त्वाचे मेसेज शोधणाऱ्या वापरकर्त्यांना सर्वात जास्त त्रास देत आहे. एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार काही technical error किंवा तात्पुरत्या server error मुळे असू शकते. मात्र या सगळ्यावर कंपनीकडून अद्याप कोणतेही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. WhatsApp web मधील ही समस्या सध्या युजरसाठी डोकेदुखी बनली आहे. जर ही समस्या दीर्घकाळ राहिली तर ती केवळ काम करणाऱ्या लोकांसाठीच नाही तर सामान्य वापरकर्त्यांसाठीही मोठी समस्या ठरू शकते. आता कंपनी यावर काय उपाययोजना करतेय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.