Sony आणि JBL ची उडणार झोप! गाणी ऐकण्याची मजा होणार दुप्पट, लाँच झाले Nothing हे नवे हेडफोन्स; इतकी आहे किंमत
भारतात नथिंगचे नवीन ओवर-ईयर हेडफोन्स लाँच करण्यात आले आहेत. हे नवीन हेडफोन्स नथिंग हेडफोन 1 या नावाने लाँच करण्यात आले आहेत. कंपनीने पहिल्यांदाच अशा प्रकारचे ओवर-ईयर हेडफोन लाँच केले आहेत. या हेडफोनची डिझाईन इतर हेडफोनपेक्षा वेगळी आणि आकर्षक आहे. या हेडफोनची विशेष गोष्ट म्हणजे या हेडफोनची बॅटरी.
नथिंगने लाँच केलेल्या या हेडफोनची बॅटरी 80 तासांपर्यंत चालते, असा दावा केला जातो. याशिवाय यूजर वॉल्यूम एडजस्ट करण्यासाठी रोलरचा वापर करू शकतात. यामध्ये ANC मोड बदलण्यासाठी वेगळे बटण देण्यात आले आहे आणि ट्रॅक बदलण्यासाठी पॅडल (Paddle) देखील आहे. यासोबतच, या Nothing Headphone 1 मध्ये ऑडियो कोडेकला सपोर्ट करण्यासाठी AAC, SBC आणि LDAC देखील आहे. (फोटो सौजन्य – X)
Nothing Headphone 1 ची भारतात किंमत 21,990 रुपये ठेवण्यात आली आहे. 15 जुलैपासून हे हेडफॉन ऑनलाइन आणि ऑफलाइन मार्केटमध्ये खरेदीसाठी उपलब्ध होणार आहेत. हे हेडफोन फ्लिपकार्ट, फ्लिपकार्ट मिनट्स, क्रोमा, विजय सेल्स आणि इतर रिटेल स्टोरद्वारे खरेदी केले जाऊ शकतात. जर एखाद्या ग्राहकाने सेलच्या पहिल्या दिवशी हे हेडफोन्स खरेदी केले तर लाँच ऑफर अंतर्गत ते 19,999 रुपयांना खरेदी करता येतील. कंपनीने हे हेडफोन्स काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या पर्यायांसह बाजारात आणले आहेत.
Headphone (1) is here. Come to Play.
Pre-order yours. 4 July. pic.twitter.com/OguDw1BS6z
— Nothing (@nothing) July 1, 2025
Nothing Headphone 1 मध्ये 40mm चे डायनामिक ड्राइवर्स देण्यात आले आहेत. हे 42dB पर्यंत अॅक्टिव नॉइस कँसेलेशन (ANC) ला देखील सपोर्ट करतात. याशिवाय, यामध्ये ट्रांसपेरेंसी मोड देखील उपलब्ध आहे, म्हणजेच गरज पडल्यास बाहेरचा आवाज देखील ऐकता येऊ शकतो. या हेडफोनच्या ऑडियो ट्यूनिंगवर देखील विशेष लक्ष देण्यात आले आहे. ब्रिटिश हाय-अँड ऑडियो ब्रँड KEF च्या साउंड इंजीनियर्सने हेडफोनला फाइन-ट्यून केले आहे.
Nothing Headphone 1 डिव्हाईसवर नजर टाकली, तर यावेळी कंपनीने यामध्ये टच कंट्रोल दिला नाही, तर यामध्ये फिजिकल बटन फिट केले आहे. उदाहरणार्थ, जर युजर्सना आवाज नियंत्रित करायचा असेल तर त्याला रोलर वापरावा लागेल. याशिवाय, अॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन (एएनसी) साठी एक बटण क्लिक करावे लागेल आणि जर ट्रॅक बदलायचा असेल तर पॅडल वापरावे लागेल.
AI ला कधीही विचारू नका हे 10 प्रश्न, चुकीच्या प्रतिसादांमुळे धोक्यात येऊ शकते तुमची सुरक्षा
या हेडफोनसोबत ब्लूटूथ 5.3 उपलब्ध असेल. याशिवाय, त्यात ड्युअल डिव्हाइस कनेक्टिव्हिटी देखील देण्यात आले आहे, जी त्याच्या सर्वात खास गोष्टींपैकी एक आहे. म्हणजेच, जर युजर्सना हवे असेल तर ते या हेडफोनसह एकाच वेळी दोन डिव्हाइस कनेक्ट करू शकतात. दुसरीकडे, हे अँड्रॉइड 5.1 आणि iOS 13 किंवा त्यावरील आवृत्तीवर चालणाऱ्या स्मार्टफोनशी देखील कनेक्ट केले जाऊ शकते. या हेडफोनचे वजन सुमारे 329 ग्रॅम आहे.