Oppo A6 5G: लूक असा की नजर हटेना! तगडा प्रोसेसर आणि मोठ्या बॅटरीने सुसज्ज, सुरुवातीची किंमत 20 हजारांहून कमी
Oppo A6 5G स्मार्टफोन 4GB रॅम+128GB स्टोरेज, 6GB रॅम+128GB स्टोरेज आणि 6GB रॅम+256GB स्टोरेज या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. Oppo A6 5G स्मार्टफोनच्या 4GB रॅम + 128GB स्टोरेजवाल्या बेस व्हेरिअंटची किंमत 17,999 रुपये, 6GB रॅम+128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 19,999 रुपये आणि टॉप-ऑफ-द-लाइन 6GB रॅम+256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 21,999 रुपये आहे. कंपनी निवडक बँकांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 1 हजार रुपयांचे इंस्टंट कॅशबॅक आणि 3 महिन्यांसाठी नो-कॉस्ट ईएमआय ऑप्शन देखील देत आहे. हा फोन Oppo इंडिया ऑनलाइन स्टोअरद्वारे विक्रीसाठी उपलब्ध आहे. Oppo A6 5G भारतात सफायर ब्लू, आइस व्हाइट आणि सकुरा पिंक कलरमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – X)
Explore the new #OPPOA65G at ₹17,999 (4GB+128GB), ₹19,999 (6GB+128GB) and ₹21,999 (6GB+256GB). Featuring 7000mAh Large Battery with 45W SUPERVOOC™️ Flash Charge and 60-Month Fluency Protection. Buy Now – https://t.co/iezlxuoE7g#BuiltForQuality #DurableAndLongLasting pic.twitter.com/8Q6Hdjovx9 — OPPO India (@OPPOIndia) January 20, 2026
Oppo A6 5G दोन नॅनो सिमला सपोर्ट करतो आणि अँड्रॉईज 15-बेस्ड ColorOS 15 सह लाँच करण्यात आला आहे. या डिव्हाईसमध्ये 6.75-इंच HD+ (720×1,570 पिक्सेल) LCD स्क्रीन आहे, ज्यामध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 240Hz पर्यंत टच सँपलिंग रेट, 83 टक्के DCI-P3 कलर गॅमेट, 16.7 मिलियन कलर, 256ppi पिक्सेल डेंसिटी आणि 1,125 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस आहे.
नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 चिपसेट आहे. यामध्ये एआरएम माली-जी57 एमसी2 जीपीयू, 6GB पर्यंत एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 256GB UFS 2.2 ऑनबोर्ड स्टोरेज देखील आहे.
फोटोग्राफीसाठी Oppo A6 5G मध्ये डुअल रियर कॅमेरा यूनिट आहे. ज्यामध्ये ऑटोफोकससह 50-मेगापिक्सेल (f/1.8) प्राइमरी शूटर आणि 2-मेगापिक्सेल (f/2.4) मोनोक्रोम कॅमेरा आहे. या स्मार्टफोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8-मेगापिक्सेल (f/2.0) फ्रंट-फेसिंग कॅमेरा देखील आहे, जो 1080p/60 fps पर्यंत व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतो. फोनमध्ये डस्ट आणि पाण्यापासून संरक्षणासाठी IP66 + IP68 + IP69 रेटिंग आहे.
Oppo A6 5G मध्ये 7,000mAh बॅटरी आहे, जी 45W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिविटीसाठी या डिव्हाईसमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 5, ब्लूटूथ 5.4, एक USB टाइप-C पोर्ट, BeiDou, जीपीएस, ग्लोनॅस, गॅलिलिओ आणि QZSS समाविष्ट आहे. ऑनबोर्ड सेंसरच्या लिस्टमध्ये प्रॉक्सिमिटी सेंसर, एम्बिएंट लाइट सेंसर, ई-कंपास आणि एक्सेलेरोमीटर समाविष्ट आहे. हँडसेटमध्ये सिक्योरिटीसाठी साइड-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस अनलॉक सपोर्ट देखील देण्यात आला आहे.
Ans: Oppo हा चीनमधील स्मार्टफोन ब्रँड आहे. BBK Electronics समूहाचा भाग आहे.
Ans: होय. Oppo चे अनेक स्मार्टफोन्स “Make in India” अंतर्गत भारतातच तयार केले जातात.
Ans: होय. Oppo फोन AI कॅमेरा, पोर्ट्रेट मोड आणि लो-लाईट फोटोग्राफीसाठी प्रसिद्ध आहेत.






