या दिवशी सुरु होणार Google Pixel 9a ची पहिली विक्री, ऑफर्स आणि डिस्काऊंटसह मिळणार खरेदीची संधी! असे आहेत स्मार्टफोनचे फीचर्स
टेक जायंट कंपनी अॅपलला टक्कर देण्यासाठी स्मार्टफोन कंपनी गुगलने त्यांचा परवडणारा स्मार्टफोन बाजारात लाँच केला आहे. गुगलने या महिन्याच्या सुरुवातीला Pixel 9a स्मार्टफोन लाँच केला होता. स्मार्टफोन लाँचिंगच्या वेळी कंपनीने त्याच्या पहिल्या विक्रीची तारीख जाहीर केली नव्हती. त्यामुळे या स्मार्टफोनची विक्री कधीपासून सुरु होणार, याबाबत युजर्समध्ये प्रचंड उत्सुकता होती. आता अखेर युजर्सची ही उत्सुकता संपणार आहे, कारण कंपनीने या स्मार्टफोनच्या पहिल्या विक्रीची तारीख जाहीर केली आहे.
स्मार्टफोन कंपनी गुगलने लाँच केलेल्या Google Pixel 9a ची पहिली विक्री एप्रिल महिन्यात सुरु होणार आहे. या स्मार्टफोनच्या विक्रीवेळी युजर्सना मोठ्या प्रमाणात ऑफर्स आणि डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. काही रिपोर्ट्समध्ये असं सांगितलं जात आहे की, Pixel 9a युनिट्समधील कंपोनेंट क्वालिटीच्या समस्यांमुळे Pixel 9a च्या विक्रीसाठी विलंब होत आहे. या सगळ्यानंतर, गुगलने अखेर Pixel 9a ची विक्री तारीख जाहीर केली आहे. हा फोन एप्रिल महिन्यात विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. पहिल्या सेलमध्ये अनेक प्रकारच्या बँक सवलती देखील दिल्या जातील. (फोटो सौजन्य – Google)
Google Pixel 9a ची विक्री 10 एप्रिलपासून अमेरिका, कॅनडा आणि यूकेमध्ये सुरू होईल. यानंतर, तो 14 एप्रिलपासून संपूर्ण युरोपमध्ये उपलब्ध होईल. भारत, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, तैवान आणि मलेशियामधील ग्राहक 16 एप्रिलपासून हा फोन खरेदी करू शकतील. तथापि, जपानच्या बाजारपेठेतील विक्रीची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. भारतात Pixel 9a ची किंमत 256GB स्टोरेज व्हेरिएंटसाठी 49,999 रुपये ठेवण्यात आली आहे.
हा फोन फ्लिपकार्टवर आयरिस, ऑब्सिडियन आणि पोर्सिलेन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. याव्यतिरिक्त, एचडीएफसी बँक, आयडीएफसी बँक आणि बजाज फिनसर्व्ह कडून 3,000 रुपयांची मर्यादित काळाची कॅशबॅक ऑफर आणि 24 महिन्यांची नो-कॉस्ट ईएमआय सुविधा देखील दिली जात आहे. जर तुम्ही गुगलचे नवीन डिव्हाइस कमी किमतीत खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही 16 एप्रिलपर्यंत वाट पाहू शकता. हा गुगलच्या Pixel 9 सिरीजमधील सर्वात परवडणारा फोन आहे. त्यातील स्पेसिफिकेशन देखील दमदार आहेत.
Google Pixel 9a ची रचना कॉम्पॅक्ट आहे, त्याची फ्रेम सपाट आहे आणि मागे सिग्नेचर कॅमेरा बार नाही. यात 6.3 -इंचाचा पॉलेड डिस्प्ले आहे, जो FHD+ रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह येतो.
फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 48 मेगापिक्सेलचा मुख्य सेन्सर (OIS सह) आणि 13 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्स आहे. सेल्फीसाठी 13 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.
हा फोन टेन्सर G4 प्रोसेसरने सुसज्ज आहे, जो प्रीमियम पिक्सेल 9 मालिकेत देखील आहे. यात 8 जीबी रॅम आणि 256 जीबी पर्यंत स्टोरेज आहे.
Pixel 9a मध्ये 5,100mAh बॅटरी आहे, जी 23W वायर्ड आणि 7.5W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.
हा फोन अँड्रॉइड 15 वर चालतो. त्याला सात वर्षांपर्यंत सॉफ्टवेअर अपडेट्स मिळतील. ज्यांना दीर्घकालीन अपडेट्स हवे आहेत त्यांच्यासाठी हा एक चांगला पर्याय असू शकतो.
फोनमध्ये IP68 सर्टिफिकेशन, कार क्रॅश डिटेक्शन, वायफाय-6E, eSIM आणि NFC सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.