Samsung Galaxy S24 आणि Galaxy S24 Ultra चे एंटरप्राइज एडिशन लाँच, जाणून घ्या खास फीचर्स
टेक कंपनी सॅमसंगने त्यांच्या Samsung Galaxy S24 आणि Galaxy S24 Ultra स्मार्टफोनचे एंटरप्राइज एडिशन लाँच केले आहे. 2024 च्या सुरुवातीला एंटरप्राइज एक्सक्लुझिव्ह Samsung XCover7 स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आला. यानंतर आता कंपनीने फ्लॅगशिप Samsung Galaxy S24 आणि Galaxy S24 अल्ट्रा स्मार्टफोन्सचे एंटरप्राइझ एडिशन देखील लाँच केले आहे. या स्मार्टफोन्समध्ये अनेक कमाल फीचर्स देण्यात आले आहेत.
Google Map Update: गुगल मॅपमध्ये होणार मोठे बदल, आता फ्रीमध्ये मिळणार या सर्विस
Samsung Galaxy S24 आणि Galaxy S24 अल्ट्रा स्मार्टफोन्सच्या एंटरप्राइझ एडिशनबद्दल अनेकांना प्रचंड उत्सुकता आहे. चला तर मग या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि किंमतीबद्दल जाणून घेऊया. Samsung Galaxy S24 आणि Galaxy S24 अल्ट्रा स्मार्टफोन्सच्या एंटरप्राइझ एडिशनमध्ये पहिल्या वर्जनप्रमाणेच काही वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. या स्मार्टफोनच्या Lexi AI मध्ये रिअल-टाइम व्हॉइस आणि टेक्स्ट ट्रान्सलेशनसाठी लाइव्ह ट्रान्सलेट आणि इंटरप्रिटर सारखी वैशिष्ट्ये आहेत. (फोटो सौजन्य – pinterest)
दोन्ही फोनला तीन वर्षांची वॉरंटी मिळणार आहे आणि फर्मवेअर अपडेट सात वर्षांसाठी उपलब्ध असतील. सर्कल टू सर्च सारखे फीचर्स यामध्ये उपलब्ध असतील. हा स्मार्टफोन कॉर्पोरेट युजर्ससाठी भारतात लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनसोबत सॅमसंग नॉक्स सिक्युरिटी सब्सक्रिप्शन 12 महिन्यांसाठी दिले जात आहे.
Samsung Galaxy S24 आणि Galaxy S24 अल्ट्रा स्मार्टफोन्सचे एंटरप्राइझ एडिशन 78,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आले आहेत. हा फोन सॅमसंग कॉर्पोरेट प्लस पोर्टलवरून खरेदी करता येईल. सॅमसंग गॅलेक्सी एस 24 आणि गॅलेक्सी एस 24 अल्ट्रा एंटरप्राइज एडिशनमध्ये व्हॉईस रेकॉर्डिंगची विशेष सुविधा देखील देण्यात आली आहे.
या स्मार्टफोन्समध्ये ट्रान्स्क्रिप्ट असिस्ट, स्पीच टू टेक्स्ट टेक्नॉलॉजी आणि ट्रान्सलेट रेकॉर्डिंग सारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत, जी कॉर्पोरेट्ससाठी खूप चांगली असणार आहे. त्याची उर्वरित वैशिष्ट्ये Samsung Galaxy S24 Ultra आणि Galaxy S24 स्मार्टफोन्स सारखीच आहेत. त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
Galaxy S24 Ultra मध्ये 6.8-इंचाचा Edge QHD+ डायनॅमिक AMOLED 2X डिस्प्ले आहे जो 1Hz–120Hz चा अनुकूल रिफ्रेश दर देतो, तर Galaxy S24 मध्ये 6.2-इंचाचा फुल-एचडी+ डिस्प्ले आहे.
Galaxy S24 Ultra मध्ये Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर आहे.
Year Ender 2024: 2024 मध्ये Google वर सर्वात जास्त काय सर्च केलं? जाणून घ्या
कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर, Galaxy S24 Ultra मध्ये 200-मेगापिक्सेल वाइड कॅमेरासह क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे. Galaxy S24 मध्ये 50-मेगापिक्सेल वाइड कॅमेरासह ट्रिपल रियर कॅमेरा युनिट आहे. दोन्ही मॉडेल्समध्ये 12-मेगापिक्सेल सेल्फी सेन्सर आणि IP68 डस्ट आणि वॉटर रेझिस्टन्स रेटिंग आहे.
Galaxy S24 Ultra मध्ये 5,000mAh बॅटरी आहे आणि Galaxy S24 मध्ये 4,000mAh बॅटरी आहे.