2 लाखांचा फोल्डेबल फोन? Samsung Galaxy Z Fold 8 Ultra च्या किंमतीबाबत मोठा खुलासा, इव्हेंटपूर्वीच फीचर्स लीक
कंपनीच्या आगामी ईव्हेंटपूर्वीच काही लीक्स समोर आले आहेत. यावरून असा अंदाज लावला जात आहे की, कंपनी त्यांचा आगामी गॅलेक्सी झेड फोल्ड 8 अल्ट्रा 2,099 डॉलर म्हणजेच सुमारे 2,00,300 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर या ईव्हेंटमध्ये कंपनी एकापेक्षा एक फोल्डेबल मॉडेल सादर करण्याची शक्यता आहे. रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, लाँचच्या वेळेपासूनच या नवीन फोल्डेबल्समध्ये गूगलची जेमिनी इंटेलिजन्स समाविष्ट केली जाईल. सॅमसंग 22 जुलै रोजी होणाऱ्या गॅलेक्सी अनपॅक्ड इव्हेंटमध्ये आपल्या पुढच्या पिढीतील फोल्डेबल स्मार्टफोन्सचे अनावरण करेल अशी अपेक्षा आहे. (फोटो सौजन्य: Pinterest)
एका समोर आलेल्या रिपोर्टनुसार, Galaxy Z Fold 8 Ultra च्या 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत अमेरिकेत 2,099 डॉलर म्हणजेच सुमारे 2,00,300 रुपये असू शकते. जर हा दावा खरा ठरला तर आगामी फोन Galaxy Z Fold 7 च्या तुलनेत 100 डॉलर म्हणजेच सुमारे 9,500 रुपयांनी महाग असणार आहे. Galaxy Z Fold 7 1,999 डॉलर म्हणजेच सुमारे 1,90,700 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आला होता. रिपोर्टनुसार, मेमरी घटकांच्या वाढत्या किमतींचा परिणाम कंपनीच्या आगामी स्मार्टफोन्सच्या किमतींवर होऊ शकतो.
गॅलेक्सी झेड फोल्ड 8 अल्ट्रा आणि नवीन वाइड फोल्डेबल फोन हे वन यूआय 9.0 आणि गूगलच्या जेमिनी इंटेलिजन्ससह येणारे पहिले स्मार्टफोन्स असतील, जे यूजर्सना एकाच विनंतीद्वारे एकाच वेळी अनेक ॲप्लिकेशन्समध्ये क्रिया सुरू करण्याची परवानगी देतील.
रिपोर्टमध्ये असा देखील दावा करण्यात आला आहे की, सॅमसंग एका वाइड फोल्डेबल फोनवर देखील काम करत आहे. हा फोन सध्या गॅलेक्सी झेड वाईड फोल्ड असल्याचे म्हटलं जात आहे. 4:3 आस्पेक्ट रेशियो असलेला या वाईड इनर डिस्प्ले प्रोडक्टिविटी टास्क आणि मीडिया पाहण्यासाठी जास्त स्क्रीन स्पेस देणार आहे. या गॅलेक्सी झेड वाईड फोल्डच्या 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 1,899 डॉलर म्हणजेच सुमारे 1,81,200 रुपये असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यापूर्वीच्या लीक्समधून मिळालेल्या संकेतांनुसार, रेगुलर गॅलेक्सी झेड फोल्ड 8 स्मार्टफोन स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 चिपसेटने सुसज्ज असू शकतो आणि यामध्ये 4,800mAh बॅटरी दिली जाण्याची शक्यता आहे. लीक झालेल्या स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, याच्या रिअर कॅमेरा सिस्टिममध्ये दोन 50 मेगापिक्सेलचे सेंसर्स समाविष्ट असू शकतात.
Samsung ची लोकप्रिय Galaxy Z Flip सीरीज होणार बंद? टिप्स्टरने दिले महत्त्वाचे संकेत, वाचा सविस्तर
प्रीमियम गॅलेक्सी झेड फोल्ड 8 अल्ट्रा मध्ये स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 फॉर गॅलेक्सी चिपसेटचा वापर केला जाण्याची शक्यता आहे. या डिव्हाईसमध्ये 5,000mAh बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेरा सिस्टिम दिली जाण्याची शक्यता आहे, ज्यामध्ये 200 मेगापिक्सेलचा प्रायमरी सेंसर, 50 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि 3x ऑप्टिकल झूमवाला 10 मेगापिक्सेलचा टेलीफोटो कॅमेरा समाविष्ट असू शकतो. छोटे क्लॅमशेल मॉडेल म्हणजेच सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप 8 मध्ये स्नॅपड्रॅगन चिपसेटचा वापर केला जाऊ शकतो. भारतासह इतर प्रदेशांमध्ये एक्सिनोस व्हेरिअंट मिळण्याची शक्यता आहे.






