सेलमधील ऑफर खरी की केवळ दिखावा? हे Free टूल सांगणार प्रत्येक वस्तूची खरी किंमत; आता प्रत्येक डीलची होईल पोलखोल
अनेकदा कंपन्या सेल सुरु होण्यापूर्वी वस्तूंच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढवतात. त्यानंतर सेलमध्ये वस्तूंच्या किंमती पुन्हा कमी करून मोठं डिस्काऊंट मिळत असल्याचा दावा केला जातो. त्यामुळे अनेकदा आपल्याला समजत नाही की प्रोडक्ट्स खरंच स्वस्त झालेत आहेत की नाही. तुम्हाला देखील सेलमध्ये शॉपिंग करताना हीच शंका असते का? आता तुमची ही शंका दूर करण्यासाठी एक फ्री टूल तुम्हाला मदत करू शकते. या फ्री टूलच्या मदतीने तुम्हाला समजू शकते की, सेलमध्ये प्रोडक्ट खरंच स्वस्त झाले आहे की नाही. जर तुम्ही सध्या फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉनवर सुरु असलेल्या सेलमध्ये स्मार्टफोन किंवा इतर कोणते गॅझेट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही प्रोडक्टच्या खऱ्या किंमतीबद्दल जाणून घेण्यासाठी हे टूल वापरू शकता. (फोटो सौजन्य: Pinterest)
या फ्री टूलचे नाव Buyhatke असे आहे. हे एक फ्री क्रोम एक्सटेंशन आहे. हे इंस्टॉल केल्यानंतर तुम्ही फ्लिपकार्ट आणि ॲमेझॉन सारख्या इतर अनेक ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्सवरील कोणत्याही प्रोडक्टच्या किंमतीचा इतिहास तपासू शकता. तसेच, फोन किंवा एखाद्या दुसऱ्या प्रोडक्टची किंमत काही महिन्यांपूर्वी किती होती आणि आता सेलमध्ये उपलब्ध असलेली ऑफर खरंच फायदेशीर आहे की नाही, याबाबत देखील हे टूल तुम्हाला माहिती देणार आहे. तसेच हे टूल तुम्हाला संबंधित प्रोडक्टची किंमत बाकी वेबसाईट्सवर किती आहे, हेदेखील सांगणार आहे.






