आधी थप्पड मारली, मग केस उपटले अन्...; कोल्ड ड्रिंकसाठी महिला आणि माकडात तुंबळ हाणामारी, VIDEO पाहून हसू आवरणार नाही (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, एक महिला पर्यटन स्थळाला भेट द्यायला गेली आहे. ती कोल्ड ड्रिंक पित-पित आरामात चालत आहे. याच वेळी अचानक एक माकड येऊन तिच्या हातातून बॉटल हिसकावून घेऊ लागते. महिला मात्र, त्याला तसे करु देत नाही. ती त्याला चटाचटा मारायला लागते. माकडी गप्प बसत नाही. ते देखील महिलाला सटासट कानाखाली मारते. तिचे केसही ओढते. पण माकडाला कोल्ड ड्रिंकची बॉटल देत नाही. यानंतर माकड तिथून निघून जाते. महिला परत आरामात कोल्ड ड्रिंक पित चालू लागते. पण काही सेकंदांनी माकड मागून येऊन तिच्या हातातील बॉटल हिसकावून घेते.
Monkey trying to snatch the drinkefrom the japanese girl.
A cute tug of war happened girl saved her drink but the plot twist.. another one done the job very smoothly 😅 pic.twitter.com/FuQOIVvYGC — Anand Mishra _🚩_⚕️ (@Docpoet1) July 7, 2026
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मात्र, हा व्हिडिओ १००% एआयने तयार केलेला असल्याचे लोकांनी म्हटले आहे. परंतु हा व्हिडिओ बघून मज्जा आली असे लोकांचे म्हणणे आहे. एका नेटकऱ्याने मजेशीर कमेंट करत म्हटले आहे की, बिचारीला वाटलं जिंकली, पण माकडाने दाखून दिला कोण डॉन आहे. तर दुसऱ्या एका नेटकऱ्याने हे खरोखर घडायला पाहिजे महिलाच जिंकेल असे म्हटले आहे.
मात्र, या व्हिडिओतील माकडाच्या हालचालींवरुन हा व्हिडिओ एआयआणि ग्राफिक्सद्वारे तयार केले असल्याचे स्पष्ट समजत आहे. परत यामुळे एआयद्वारे गैरप्रकार घडण्याचेही जास्त शक्यता आहे. या व्हिडिओमुळे पुन्हा एकदा एआयच्या गैरवापराबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






