DeepSeek AI चा भारताला धोका? सरकारने सर्व काही केले स्पष्ट, जाणून घ्या सविस्तर
चीनचा AI चॅटबॉट DeepSeek ने सर्वत्र खळबळ उडवली आहे. DeepSeek च्या AI चॅटबॉटने जगभरातील तंत्रज्ञान समुदायाला आश्चर्यचकित केले आहे. DeepSeek ने जगातील पहिल्या AI चॅटबॉट Chatgpt ला देखील मागे टाकलं आहे. त्यामुळे आता सर्वत्र चीनचा AI चॅटबॉट DeepSeek चर्चेत आहे. अलीकडेच असा आरोप करण्यात आला आहे की, डीपसीकच्या मागे चीनचा काही मोठा हेतू लपलेला असू शकतो. DeepSeek वर यापूर्वीही डेटा चोरीचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे सर्वच देशांमध्ये भिती निर्माण झाली आहे. AI चॅटबॉट DeepSeek मुळे भारताला काही धोका आहे का, अशी चिंता देखील अनेकांनी व्यक्त केली आहे.
Nothing Phone 3a मध्ये मिळणार 50MP रिअर कॅमेरा आणि बरंच काही, लाँचिंगपूर्वी स्पेसिफिकेशन्स लिक
माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातील एका वरिष्ठ सूत्राने सांगितलं आहे की, डीपसीकमुळे भारताला कोणताही धोका नाही किंवा भारतातून चीनला संवेदनशील डेटा पाठवला जाण्याचा देखील धोका नाही. वरील सूत्रानुसार, एआयमधील स्पर्धेचे युग नुकतेच सुरू झाले आहे आणि भारत मागे पडला आहे असे म्हणता येणार नाही. हे शक्य आहे की भारत-आधारित स्टार्टअप किंवा AI वर काम करणारी कंपनी DeepSeek पेक्षा अधिक चांगले आणि परवडणारे ओपन सोर्स प्लॅटफॉर्म लाँच करू शकते. (फोटो सौजन्य –सोशल मीडिया)
गुरुवारी भारत सरकार डीपसीकच्या परिणामाबद्दल आणि भारताच्या तयारीबद्दल अधिकृत विधान देणार आहे. त्यामुळे अधिकृतपणे स्पष्ट होईल की डीपसीकमुळे भारताला धोका आहे की नाही. DeepSeek ने ओपनएआयच्या चॅटबोटला मागे टाकल्याने त्याची सर्वत्र चर्चा सुरु झाली आहे. अगदी काही दिवसातंच DeepSeek ने अमेरिकेत आपलं वेगळं स्थान निर्माण केलं.
एआयच्या शर्यतीत भारत मागे पडला आहे का, असे विचारले असता, अनेकांनी याला नकार दिला आहे. कारण AI च्या शर्यतीत आघाडीवर येण्यासाठी 7000 स्टार्टअप्स भारतात कार्यरत आहेत.
AI व्यतिरिक्त, मशीन लर्निंग, इंटरनेट ऑन थिंग्ज, ब्लॉकचेन यांसारख्या नवीन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारतीय स्टार्टअप्सबद्दल जगभरात उत्सुकता आहे. डाओस (स्वित्झर्लंड) येथे नुकत्याच झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीत अमेरिका आणि चीनसह भारताची जगातील तीन सर्वात मोठी तंत्रज्ञान केंद्रे म्हणून ओळख झाली आहे.
ChatGPT ला मागे टाकणारा DeepSeek फोनमध्ये इंस्टॉल करायचाय? पटापट फॉलो करा या सोप्या Steps
भारतातील अग्रगण्य AI कंपनी, Jinani.ai.in चे CEO गणेश गोपालन म्हणतात, DeepSeek लाँच करणे हे एक अतिशय उत्साहवर्धक पाऊल आहे. विशेषत: ज्याप्रकारे त्याने लार्ज लँग्वेज मॉडेल (LLM) आधारित व्यवसाय संरचना हादरवून टाकली आहे. पाच दशलक्ष डॉलर्सपेक्षा कमी खर्चात एलएलएम आधारित सेवा सुरू केली जाऊ शकते आणि तीही इतक्या उच्च कार्यक्षमतेने सुरू केली जाऊ शकते हे अकल्पनीय आहे. आता भारतासह जगातील प्रत्येक एआय कंपनी याची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करेल.