'BSNL' च्या या मॅसेजना युजर्सचा संताप, कंपनी 'हे' 3 स्वस्त प्लॅन बंद करण्याच्या तयारीत
देशातील सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने एक मोठा निर्णय घेतला आहे. BSNL कंपनीचे 3 स्वस्त रिचार्ज प्लॅन बंद करण्याच्या तयारीत आहे. यासंबंधित काही युजर्सना मॅसेज देखील पाठवण्यात आला आहे. BSNL कंपनीने घेतलेल्या या निर्णयामुळे युजर्समध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. याचं कारण म्हणजे BSNL त्यांच्या स्वस्त रिचार्ज प्लॅनसाठी ओळखली जाते. जेव्हा देशातील खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किंमतीत वाढ केली, तेव्हा BSNL ने मोबाईल युजर्सना दिलासा देत स्वस्त रिचार्ज प्लॅन लाँच केले. मात्र आता कंपनीने हेच स्वस्त रिचार्ज प्लॅन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
तुमच्या iPhone मध्ये आधीच TikTok इंस्टॉल आहे? थांबा डिलीट करू नका, मिळवा लाखो रुपये कमवण्याची संधी
सरकारी टेलिकॉम कंपनी पुढील महिन्यात आपले तीन बजेट रिचार्ज प्लॅन बंद करण्याचा विचार करत आहे. या योजना “प्लॅन व्हाउचर” श्रेणी अंतर्गत येतात. BSNL त्यांच्या युजर्सना चांगल्या नेटवर्कचा अनुभव घेता यावा यासाठी प्रयत्न करत आहे. ठिकठिकाणी कंपनीचे टॉवर देखील लावले जात आहेत. अलीकडे, BSNL ने आपले नेटवर्क सुधारण्यासाठी 65,000 हून अधिक 4G मोबाइल टॉवर सक्रिय केले आहेत. खाजगी टेलिकॉम कंपन्यांनी केलेल्या दरवाढीनंतर बीएसएनएल वापरकर्त्यांची संख्या प्रचंड वाढली होती. पण अलीकडे सादर केलेल्या अहवालानुसार, बीएसएनएल वापरकर्त्यांच्या संख्येत घट झाल्याचं पाहायला मिळाली. अशातच आता कंपनीने त्यांचे रिचार्ज प्लॅन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
BSNL वापरकर्त्याने सोशल मीडियावर एसएमएसचा स्क्रीनशॉट शेअर केला, ज्यामध्ये कंपनीने तीन बजेट रिचार्ज प्लॅन बंद केले जात असल्याची माहिती दिली. मॅसेजमध्ये लिहिले होते, ‘प्रिय ग्राहक, प्लॅन व्हाउचर 201, 797 आणि 2999 हे 10.02.2025 पासून बंद केले जात आहेत. इतर व्हाउचरच्या माहितीसाठी कृपया सेल्फकेअर ॲप डाउनलोड करा आणि रिचार्जवर 2% सूट मिळवा. धन्यवाद.’ युजरने सांगितले की त्याला हा मेसेज त्याच्या बीएसएनएल नंबरवर आला होता. हे तीन प्लॅन 365 दिवसांपर्यंत वैधता आणि अनेक फायदे देतात. BSNL ने घोषणा केली आहे की हे प्लॅन 10 फेब्रुवारी 2025 पासून बंद केले जातील. त्यामुळे युजरने प्रचंड संताप व्यक्त केला आहे.
You should be ashamed that to benefit private telecom companies, BSNL’s 201, 797, 2999 plans are being discontinued. How much more will you recover from the poor? pic.twitter.com/UVKt9BQadS
— Ayush Srivastava(Chitransh) (@AyushAsji21861) January 27, 2025
5000mAh बॅटरी आणि पंच होल डिस्प्लेसह Infinix चा नवीन स्मार्टफोन लाँच! किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी
तुम्ही या तीनपैकी कोणताही प्लॅन वापरत असाल तर 10 फेब्रुवारी 2025 पूर्वी तुमच्या प्लॅनची वैधता तपासा. BSNL च्या इतर उपलब्ध योजनांबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्ही BSNL Selfcare ॲप डाउनलोड करू शकता आणि रिचार्जवर 2% सूट देखील मिळवू शकता.