खोल समुद्रात बुडलेला फोन सापडला, या फीचरमुळे लागला मालकाचा शोध! घटना वाचून तुम्हीही व्हाल हैराण
आयफोनमध्ये असे अनेक फीचर्स आहेत, ज्यामुळे तुम्ही अगदी सहज तुमचा हरवलेला आयफोन ट्रॅक करू शकता. कंपनीने देखील असं अनेकवेळा सांगितलं आहे की, आयफोनच्या सिक्योरिटी नंबरमुळे हरवलेला फोन अगदी सहज शोधला जाऊ शकतो. जर फोन चोरी झाला किंवा एखाद्या ठिकाणी हरवला तर तुम्ही तो सहज शोधू शकता, यामध्ये काही शंकाच नाही. पण जर तुमचा फोन आयफोन समुद्रात पडला तर?
या Windows यूजर्सवर हॅकर्सची नजर, मोठा सायबर अटॅक होण्याची शक्यता! सुरक्षेसाठी आत्ताच करा हे काम
तुम्ही कधी विचार केला आहे का, की समुद्रात पडलेला आयफोन परत मिळू शकतो. एवढंच नाही तर हा पाण्यातील आयफोन पुन्हा चालू देखील होऊ शकतो. अशीच घटना सध्या घडली आहे. या घटनेमुळे सर्वचजण आश्चर्यचकित झाले आहेत. कारण खोल समुद्रात हरवलेला आयफोन सापडला आहे. आणि एवढचं नाही तर हा आयफोन चालू देखील झाला आणि तो त्याच्या मालकाला परत देण्यात आला. या घटनेबद्दल अधिक जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – pinterest)
समुद्रात हरवलेला फोन परत मिळवणे खूप कठीण आहे. सर्वात मोठी समस्या ही आहे की फोन पाण्यात पडल्यानंतर खराब होतो आणि अशावेळी फोन पुन्हा सुरु होणं खूप कठीण आहे. त्यामुळे या फोनच्या मालकाचा शोध घेणं जवळपास अशक्य आहे. पण एखादी अशी देखील घटली आहे, ज्यामध्ये समुद्रात पडलेला आयफोन योग्यरित्या काम करतो आणि तो त्याच्या मालकाला परत देण्यात आला आहे. हे सर्व आयफोनमधील एका फीचरच्या मदतीने घडलं आहे. हे एक असं फीचर आहे, ज्याच्याकडे सामान्यतः दुर्लक्ष केले जाते.
हे प्रकरण ब्राझीलमधील साओ पाउलो येथील मारेसियास बीच येथील आहे. येथे थियागो इटागाकी नावाच्या व्यक्तीला समुद्रात तरंगताना आयफोन दिसला. मध्यभागी सुमारे 10 मीटर अंतरावर सुमारे 10 फूट खोल पाण्यात तो बुडाला होता. संबंधित व्यक्तिने तिथून फोन उचलला आणि समुद्रकिनारी येऊन लोकांकडे चौकशी केली, पण कोणाचा फोन होता हे कोणालाच माहित नव्हते.
घरी आल्यानंतर थियागो फोन सुकण्याची वाट पाहू लागला. यानंतर त्याने चार्ज केला तेव्हा फोन व्यवस्थित काम करत होता. त्यानंतर त्याला मेडिकल आयडी फीचर वापरण्याची कल्पना सुचली. मेडिकल आयडीमध्ये, आयफोन वापरकर्ते त्यांच्या आरोग्य आणि आपत्कालीन संपर्कांशी संबंधित महत्त्वाची माहिती साठवू शकतात. हे फीचर कोणत्याही पासवर्डशिवाय ओपन केले जाऊ शकते. या वैशिष्ट्यामुळे, थियागो फोनच्या वास्तविक मालकापर्यंत पोहोचू शकला.
मेडिकल आयडीमध्ये ‘लव्ह’ नावाने सेव्ह केलेल्या नंबरवर थियागोने संपर्क साधला असता त्याला आयफोनचा खरा मालक कळला. फोन रिकव्हर झाल्याची माहिती ऐकून फोनचा मालकही हैराण झाला. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला हा फोन हरवला असल्याचे त्यांनी सांगितले. इतक्या दिवसांनी त्याचा फोन परत मिळाल्याने त्याच्या मालकाला खूप आनंद झाला.