Year End 2024: वर्षभरात कोणत्या अॅप्सना मिळाली युजर्सची पसंती आणि कोणत्या अॅप्सवर पडला सरकारचा हातोडा?
टेकजायंट कंपनी अॅपलने एक यादी शेअर केली आहे. या यादीमध्ये यावर्षी अॅपल आयफोन, आयपॅड आणि अॅपल आर्केडमध्ये सर्वाधिक डाउनलोड केलेले ॲप्स आणि गेम यांच्याबद्दल सांगितलं आहे. लोकप्रिय मोफत मॅसेजिंग ॲप व्हॉट्सॲप या यादीत आघाडीवर आहे. फोकस फॉर प्रोडक्टिविटी हे सर्वाधिक डाउनलोड केलेल्या सशुल्क ॲप्समध्ये शीर्षस्थानी आहे. अॅपलने शेअर केलेल्या यादीमध्ये कोणकोणत्या अॅप्सचा समावेश आहे, याबद्दल जाणून घेऊया.
OnePlus 13 च्या लाँचिंगपूर्वीच स्वस्त झाला हा स्मार्टफोन, कमी किंमतीत मिळणार महागड्या फोनचे फीचर्स
2024 मध्ये YouTube आणि Google Pay हे सर्वात जास्त डाउनलोड केलेले मोफत iPhone ॲप होते. Apple च्या मते, YouTube आणि Google Pay हे 2024 मध्ये सर्वात जास्त डाउनलोड केलेले मोफत iPhone ॲप होते. तर सशुल्क ॲप चार्टमध्ये मनी मॅनेजर दुसऱ्या स्थानावर, DSLR कॅमेरा तिसऱ्या स्थानावर, Shadow Rocket चौथ्या स्थानावर आणि iTablaPro पाचव्या स्थानावर आहे.(फोटो सौजन्य – pinterest)
गेमिंगच्या बाबतीत, बॅटलग्राउंड्स मोबाइल इंडिया (BGMI) हा iPhone वर सर्वाधिक डाउनलोड केलेला मोफत गेम होता. यानंतर लुडो किंग आणि सबवे सर्फर्सने टॉप 3 मध्ये स्थान मिळवले. सशुल्क गेममध्ये Minecraft सर्वात जास्त डाउनलोड केले गेले. Earn to Die 2 आणि Hitman Sniper ने टॉप 3 सशुल्क iPhone गेममध्ये दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले.
अॅपल आर्केडवरील शीर्ष गेमची यादी देखील जारी केली गेली आहे. Getting Over It+ हा 2024 चा iPhone वर सर्वाधिक डाउनलोड केलेला अॅपल आर्केड गेम होता. यानंतर, NBA 2K24 आर्केड एडिशन, Snake.io +, Asphalt 8: Airborne + आणि Angry Birds Reloaded या नावांचा समावेश करण्यात आला.
सर्वाधिक डाऊनलोड केलेल्या गेम्सबद्दल तर समजलं पण तुम्हाला माहित आहे का यावर्षी सरकारने कोणते अॅप्स बॅन केले आहेत. सरकारने 18 OTT ॲप्सवर बंदी घातली आहे. डिजिटल कंटेंटचे नियमन करण्याच्या दिशेने भारत सरकारने हे मोठे पाऊल उचलले आहे. सरकारने अश्लील आणि अनैतिक सामग्रीचा प्रचार करणाऱ्या 18 अॅप्सवर बंदी घातली आहे.
नवीन वर्षात Nothing करणार मोठा धमाका, लाँच होणार हे नवीन स्मार्टफोन्स! काय असतील स्पेसिफिकेशन्स?
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, हे प्लॅटफॉर्म IT कायद्याच्या कलम 67 आणि 67A चे उल्लंघन करत होते, जे अश्लील साहित्य वितरणाशी संबंधित होते. याव्यतिरिक्त, सरकारने आयपीसीच्या कलम 292 अन्वये गुन्हे नोंदवले आहेत. यापैकी बऱ्याच ॲप्सनी चांगली लोकप्रियता मिळवली, काहींचे 10 दशलक्षाहून अधिक डाउनलोड आहेत. हे प्लॅटफॉर्म फेसबुक, व्हॉट्सॲप आणि यूट्यूब सारख्या सोशल मीडिया चॅनेलचा वापर करून सामग्रीचा प्रचार करत होते. त्यामुळे या अॅप्सना बॅन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही कारवाई आयटी कायद्याच्या कलम 69A अंतर्गत करण्यात आली, जी सरकारला राष्ट्रीय सुरक्षा किंवा सार्वजनिक सुव्यवस्थेला धोका निर्माण करणारी सामग्री ब्लॉक करण्याचा अधिकार देते.