ओवरहीट झाल्यास स्मार्टफोनला लागू शकते आग! किती असावं फोनचं मिनिमम टेंपरेचर, जाणून घ्या
येत्या काही दिवसांताच उन्हाळा सुरु होणार आहे. उन्हाळ्यात आपल्याला सर्वात जास्त काळजी असते, ती म्हणजे आपल्या फोनची. मार्च ते जून या काळात भारतातील अनेक भागात तीव्र उष्णता असते. या उष्णतेमुळे आपला स्मार्टफोन आणि इतर गॅझेट्स गरम होणे खूप सामान्य आहे. पण ही गॅझेट्स किंवा आपला स्मार्टफोन ओव्हरहिट झाला तर त्याचा ब्लास्ट होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे.
उन्हाळ्यात आपला स्मार्टफोन मिनिमम टेंपरेचरवर असेल याकडे आपणं लक्ष दिलं पाहिजे, कारण स्मार्टफोन अधिक गरम होणं आपल्यासाठी धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे आपला स्मार्टफोन सुरक्षित तापमानात ठेवणे महत्वाचे आहे. फोनचे तापमान किती असावे आणि तो गरम होत असल्यास काय करावे, याबद्दल जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
फोन कंपन्यांचे म्हणणे आहे की फोन चार्ज करताना किंवा वापरताना, सभोवतालचे तापमान 0-35 अंशांच्या दरम्यान असले पाहिजे. कमी तापमान देखील फोनसाठी धोकादायक ठरू शकते आणि जास्त तापमानामुळे तो गरम होऊ शकतो आणि त्याचा स्फोट देखील होऊ शकतो. त्यामुळे आपला स्मार्टफोन वापरताना आपल्या सभोवतालचे तापमान 0-35 अंशांच्या दरम्यान असल्याची काळजी घ्या. जर तुमचा फोन खूप गरम होत असेल तर तो थंड ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करा.
आजकाल स्मार्टफोन जास्त गरम झाल्यावर नोटिफिकेशन्स येऊ लागतात. असे देखील काही लोकं आहेत जे या नोटिफिकेशन्सकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे स्मार्टफोन ब्लास्ट होतो. मात्र जर तुमच्यामध्ये ओव्हरहिटींगचं नोटिफिकेशन येत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. अशावेळी फोनमधील सर्व सुरु असलेले अॅप्स बंद करा आणि फोन एका ठिकाणी ठेवा. काही स्मार्टफोनमध्ये असे फीचर्स असते की जे तापमान कमी करण्यासाठी फोनमधील अनेक वैशिष्ट्ये आपोआप बंद करतात. ज्यामुळे ओव्हरहिटींग होत नाही आणि फोन ब्लास्ट होत नाही.
फोन जास्त गरम झाल्यास सर्वप्रथम तो आपल्यापासून दूर ठेवा. जर तुम्ही फोन चार्ज करत असाल तर तो उशीखाली ठेवू नका. यामुळे तापमान आणखी वाढू शकते. जर फोन जास्त गरम झाला तर तो सपाट, थंड आणि मोकळ्या जागी ठेवा. काही काळानंतर त्याचे तापमान कमी होईल. फोन ओव्हरहिट होत असल्यास त्याचा वापर करू नका, त्याच्यावर कोणतेही अॅप्स किंवा गेम्स सुरु करू नका.
जर फोन जास्त गरम होत असेल तर तो काही काळासाठी बंद करा. यामुळे फोन लवकर थंड होण्यास मदत होईल. गरज नसल्यास, फोन जास्त काळ बंद ठेवा.
गेमिंग करताना फोनचा सीपीयू खूप मेहनत घेतो, ऑगमेंटेड रिअॅलिटी फीचर्स आणि जीपीएस नेव्हिगेशन इत्यादींचा वापर करतो. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला या अॅप्सची आवश्यकता नसेल, तर तुम्ही त्यांना बंद करू शकता. बऱ्याचदा वापरात नसतानाही अॅप्स बॅकग्राउंडमध्ये चालू राहतात, ज्यामुळे CPU वर दबाव येतो. हे अॅप्स फोर्स-क्लोज करून बंद करता येतात.
boAt ने लाँच केले बजेट फ्रेंडली ईयरबड्स, प्रिमियम लूक आणि जबदरस्त ऑडियो क्वालिटी केवळ इतक्या किंमतीत
जर तुमचा फोन चार्जिंग करताना गरम होत असेल तर तो चार्जिंगमधून काढा आणि त्याचे केस काढा. तसेच वीज केबल कुठेही तुटली आहे किंवा जळाली आहे का ते तपासा. खराब केबलमुळे फोन जास्त गरम होऊ शकतो. याशिवाय, नेहमी चांगल्या दर्जाचे चार्जर वापरा. कधीकधी चार्जर सुसंगत नसला तरीही फोन चार्जिंग करताना गरम होऊ शकतो.