Vodafone ने रचला अनोखा इतिहास, सॅटेलाइटद्वारे केला जगातील पहिला व्हिडिओ कॉल! सविस्तर जाणून घ्या
सॅटेलाईट इंटरनेट सर्विस कधी सुरु होणार, याची अनेकजण प्रतिक्षा करत आहे. एलन मस्कची सॅटेलाईट इंटरनेट सेवा स्टारलिंक देखील भारतातील एंट्रीसाठी तयारी करत आहे. जग सॅटेलाइटद्वारे मॅसेज पाठवण्याची वाट पाहत असतानाच आता व्होडाफोनने एक अनोखा इतिहास रचला आहे. व्होडाफोनने सॅटेलाइटद्वारे जगातील पहिला ‘स्पेस व्हिडिओ कॉल’ केल्याचा दावा केला आहे. कंपनीने याबाबत त्यांच्या वेबसाईटवर माहिती देत एक व्हिडीओ देखील शेअर करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे यासाठी कोणत्याही विशेष सॅटेलाइट हँडसेटची आवश्यकता नाही आणि हा स्पेस व्हिडिओ कॉल सामान्य 4G आणि 5G स्मार्टफोनद्वारे केले जाऊ शकते, असा दावा देखील आता केला जात आहे.
यूएस नेव्हीनंतर आता या देशांमध्येही DeepSeek AI वर बंदी; भारत सरकारच्या निर्णयाची प्रतीक्षा कायम
सॅटेलाइटद्वारे कम्युनिकेशन सर्विस वापरण्यासाठी विशेष उपकरणांची आवश्यकता असते, परंतु नवीन तंत्रज्ञानात तशी आवश्यकता नाही. नवीन तंत्रज्ञान सामान्य स्मार्टफोनच्या मदतीने सॅटेलाइट सर्विसमध्ये प्रवेश करू शकते. ते वापरणे म्हणजे 4G आणि 5G नेटवर्क वापरण्यासारखे आहे. कंपनी या वर्षी हे तंत्रज्ञान आणण्यास सुरुवात करणार असून पुढील वर्षी ते युरोपमध्ये उपलब्ध होईल. (फोटो सौजन्य –Vodafone)
व्होडाफोनच्या CEO Margherita Della Valle यांना कॉल करून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. एका कंपनीच्या अभियंत्याला वेल्सच्या पर्वतरांगांतून, जेथे मोबाइल नेटवर्क कव्हरेज नव्हते अशा ठिकाणाहून सॅटेलाइटद्वारे जगातील पहिला ‘स्पेस व्हिडिओ कॉल’ केल्याचा दावा केला आहे. हा कॉल वेल्श पर्वतावरून करण्यात आला होता, जेथे कोणतेही नेटवर्क सिग्नल नव्हते. कंपनीकडून फक्त सॅटेलाइट सेवेचा वापर केला जात आहे. त्याची चाचणी सामान्य उपकरणाद्वारे केली जात आहे.
ही माहिती देताना Valle म्हणाले की, कंपनी केवळ सॅटेलाइट सेवा वापरत होती, जी सॅटेलाइट सर्विसचा वापर करत होती, जी एका साधारण डिव्हाईसवर पूर्ण मोबाइलचा एक्सपीरियंस देण्यास सक्षम असेल. म्हणूनच आम्ही व्हिडिओ कॉल केला. युरोपमधील कंपनीच्या 5G नेटवर्कवर आता उपग्रह तंत्रज्ञान उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे दुर्गम भागातील कनेक्टिव्हिटीचा प्रश्न सुटणार आहे.
या तंत्रज्ञानासाठी, व्होडाफोन लॉ-अर्थ ऑरबिटमध्ये असलेल्या AST SpaceMobile च्या 5 ब्लूबर्ड उपग्रहांची मदत घेत आहे. त्याच्या मदतीने, कंपनी सामान्य स्मार्टफोनवर 120Mbps ट्रान्समिशन सेवा देत आहे. आता हे तंत्रज्ञान आपल्या वापरकर्त्यांना लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची कंपनीची योजना आहे.
जिओ आणि एअरटेलच्या एक ते दोन वर्षांनंतर व्होडाफोन-आयडियाकडून 5 जी सेवा सुरू होत आहे. पण भारताबाहेर व्होडाफोनने एक नवीन कामगिरी केली आहे. व्होडाफोनने व्हिडिओ कॉलिंगच्या जगात यश मिळवले आहे. कंपनीने जगातील पहिले सॅटेलाइट व्हिडिओ कॉलिंग केल्याचा दावा केला आहे. यासाठी स्टँडर्ड स्मार्टफोनचा वापर करण्यात आला आहे. हा कॉल दुर्गम ठिकाणाहून करण्यात आला होता. हे उपग्रह तंत्रज्ञान या वर्षाच्या अखेरीस किंवा वर्ष 2026 मध्ये प्रक्षेपित केले जाऊ शकते.