छोटा पॅकेट बडा धमाका! महागड्या रिचार्ज प्लॅनचं नो टेंशन, पुन्हा सुरु होणार 10 रुपयांचे रिचार्ज व्हाउचर?
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायने काही नवीन नियम जारी केले आहेत. या नियमांनुसार आता दूरसंचार कंपन्यांना त्यांच्या युजर्सना फक्त कॉल आणि एसएमएससाठी वेगळे प्लॅन ऑफर करावे लागणार आहेत. जे युजर्स इंटरनेट डेटा वापरत नाहीत त्यांच्यासाठी कंपन्यांना व्हॉइस कॉल आणि एसएमएससाठी स्वतंत्र प्लॅन ऑफर करावे लागणार आहेत. या नियमांमुळे कंपन्यांना नुकसान होणार की फायदा याबाबत जरी संभ्रम असला तरी देखील या नियमांचा युजर्सना मात्र नक्कीच फायदा होणार आहे. या नियमांसोबतच ट्रायने आणखी एक सुधारणा केली आहे, ती म्हणजे ट्रायने स्पेशल रिचार्ज कूपनवरील 90 दिवसांची मर्यादा काढून ती 365 दिवसांपर्यंत वाढवली आहे.
सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारने उचललं मोठं पाऊल! प्रत्येक कॉलवर ऐकू येणार ही चेतावणी
ट्रायने टेलिकॉम कंझ्युमर प्रोटेक्शन (12वी दुरुस्ती) रेगुलेशन 2024 मध्ये म्हटले आहे की, सर्विस प्रोवाइडरना किमान एक विशेष टॅरिफ व्हाउचर ऑफर करावे लागेल जे फक्त व्हॉइस आणि एसएमएससाठी असेल आणि त्याची व्हॅलिडीट 360 दिवसांपेक्षा जास्त नसेल. (फोटो सौजन्य – pinterest)
ग्राहकांना या नवीन नियमांचा फायदा होईल. कारण आता ग्राहकांना फक्त वापरत असलेल्या सेवांसाठी पैसे द्यावे लागणार आहे. याचा अर्थ असा की जर ग्राहक इंटरनेट डेटा वापरत नसेल तर तो फक्त कॉल आणि एसएमएससाठी वेगळा प्लॅन खरेदी करू शकतो. यामुळे पैशांची देखील बचत होणार आहे.
ट्रायने असेही ठरवले आहे की आता टेलीकॉम कंपन्या कोणत्याही किंमतीचे रिचार्ज व्हाउचर जारी करू शकतात. मात्र, टेलिकॉम कंपन्यांना किमान 10 रुपयांचे रिचार्ज व्हाउचर द्यावे लागेल. यापूर्वी, नियमांनुसार, टेलिकॉम ऑपरेटरना 10 रुपयांचे टॉप-अप व्हाउचर आणि त्यापेक्षा अधिक किंमतीचे रिचार्ज प्लॅन जारी करण्याची परवानगी होती. त्यामुळे आता हा 10 रुपयांचा छोटा पॅकेट प्लॅन पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे.
असे अनेक लोक आहेत ज्यांच्या घरी ब्रॉडबँड आहे त्यांना त्यांच्या मोबाईल फोनसाठी इंटरनेटसह रिचार्ज प्लॅनची आवश्यकता नसते, असं समोर आलं आहे. त्यामुळे अशा नागरिकांचा विचार करता आता 10 रुपयांचा रिचार्ज प्लॅन पुन्हा सुरु केला जाण्याची शक्यता आहे. टेलिकॉम रेग्युलेटरच्या मते, कॉल आणि एसएमएससाठी वेगळे स्पेशल रिचार्ज व्हाउचर असावेत. ट्रायने म्हटले आहे की केवळ कॉल आणि एसएमएससाठी विशेष व्हाउचर अनिवार्य केल्याने डेटाची आवश्यकता नसलेल्या ग्राहकांना एक पर्याय मिळेल.
डबल धमाका! अर्ध्या किंमतीत खरेदी करा Apple चा हा iPhone; 14 मिनिटांत होणार डिलीवरी, काय आहे ऑफर?
बहुतेक लोकांकडे दोन सिम असतात. आज 30 कोटीहून अधिक लोकं दुसरे सिम बहुधा वैयक्तिक व्हॉट्सॲप चालवण्यासाठी किंवा बँकिंग इत्यादींसाठी वापरले जाते. याचा अर्थ, तुम्हाला पहिल्या सिममधून डेटा मिळत असला तरीही, तुम्हाला तुमचे दुसरे सिमकार्ड देखील सुरु ठेवावे लागते. त्यामुळे अशा परिस्थितीत तुमच्यासाठी 10 रुपयांचाा रिचार्ज प्लॅन बेस्ट ऑप्शन ठरणार आहे.