'Vivo' घेऊन येतोय बजेट फ्रेंडली स्मार्टफोन! लाँचिंगपूर्वी समोर आली किंमत, 'या' अॅडवान्स फीचर्सचा समावेश
स्मार्टफोन कंपनी Vivo लवकरच त्यांचा नवीन आणि बजेट फ्रेंडली स्मार्टफोन Vivo Y29 5G भारतीय बाजारात लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन कधी लाँच होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नसली तरी देखील या स्मार्टफोनचे काही काही स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. लाँचिंगपूर्वीच Vivo Y29 5G स्मार्टफोनचे काही स्पेसिफिकेशन्स आणि प्राईज डिटेल्स लिक झाले आहेत. कंपनी हा स्मार्टफोन बजेट फ्रेंडली सेगमेंटमध्ये लाँच करणार आहे. त्यामुळे या स्मार्टफोनची किंमत 20 हजार रुपयांपेक्षा कमी असू शकते. चला तर मग Vivo च्या या बजेट फ्रेंडली 5G स्मार्टफोनच्या किंमती आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल जाणून घेऊया.
नवीन वर्षात एंट्री करणार ‘OPPO’ ची ही सिरीज, अनोख्या डिजाइनिंग टेक्नोलॉजीने सुसज्ज
कंपनीचा आगामी बजेट फ्रेंडली 5G स्मार्टफोन 4 व्हेरिअंटमध्ये लाँच केला जाण्याची शक्यता आहे. यामध्ये 4/128GB, 6/128GB, 8/128GB आणि 8/256GB या व्हेरिअंटचा समावेश असणार आहे. Vivo Y29 5G स्मार्टफोन 13,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केला जाऊ शकतो. तर या स्मार्टफोनच्या टॉप एंड व्हेरिअंटची किंमत 18,999 रुपये असू शकते. (फोटो सौजन्य – X)
Vivo Y29 5G स्मार्टफोनवर उपलब्ध असलेल्या सुरुवातीच्या ऑफर्सबद्दल सांगायचे तर, पहिल्या सेलमध्ये EMI वर 1500 रुपयांचा कॅशबॅक लाभ मिळू शकतो. ग्राहकांना IDFC, DBS, Induslnd आणि BOB सारख्या बँकांच्या कार्डवर सूट मिळेल. त्यामुळे पहिल्या सेलमध्ये ग्राहकांना हा स्मार्टफोन आणखी कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
एका रिपोर्टमध्ये या फोनचे सर्व स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. पॉवर बॅकअपसाठी फोन 5,500 mAh बॅटरीने सुसज्ज असू शकतो. स्मार्टफोनमध्ये फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट असेल. फोन 8MP सेल्फी कॅमेरासह लाँच केला जाऊ शकतो. त्यामुळे स्मार्टफोन बजेट फ्रेंडली सेगमेंटमध्ये लाँच केला जाणार असला तरी देखील कोणत्याही स्पेसिफिकेशनची कमतरता जाणवणार नाही.
डिस्प्ले: या फोनमध्ये 6.68 इंच डिस्प्ले असण्याची शक्यता आहे.
प्रोसेसर: परफॉर्मंससाठी MediaTek डायमेंशन 6300 SoC चिपसेट स्थापित केला जाईल.
रंग: 4GB/128GB आणि 6GB/128GB मॉडेल ग्लेशियर ब्लू, 8GB/128GB आणि 8GB/256GB मॉडेल टायटॅनियम गोल्ड रंगात लाँच केलं जाऊ शकते. या सर्व व्हेरिअंटसाठी डायमंड ब्लॅक रंग कॉमन असणार आहे.
कॅमेरा: फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा + 0.08MP QVGA सेकेंडरी कॅमेरा, सेल्फीसाठी 8MP शूटर असेल.
बॅटरी: स्मार्टफोन 5,500mAh बॅटरी दिली जाऊ शकते, जी 44W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.
इतर फीचर्स: ड्युअल 5G (SA आणि NSA), वॉटर रेझिस्टन्ससाठी IP64 रेटिंग, SGS प्रमाणन आणि मिलिटरी-ग्रेड शॉक रेझिस्टन्स
Vivo Y28 5G मध्ये 6.56-इंचाचा HD+ डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 90Hz रिफ्रेश रेट, 840nits पीक ब्राइटनेस आणि 269ppi पिक्सेल डेंसिटी आहे. यात ऑक्टा-कोर 7nm MediaTek Dimensity 6020 प्रोसेसर आहे, 12GB पर्यंत LPDDR4X RAM आणि 128GB UFS 2.2 ऑनबोर्ड स्टोरेजसह जोडलेला आहे. कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर, तुम्हाला यात ड्युअल रियर कॅमेरा युनिट मिळेल, ज्यामध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 2MP सेंसर आहे. यात 15W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी आहे.