Tech Tips: कासवाच्या गतीने चालतंय गूगल क्रोम? या टिप्स फॉलो केल्या तर रॉकेटसारखी होईल स्पीड
गुगल क्रोम हे जगातील सर्वाधिक वापरलं जाणार वेब ब्राऊझर आहे. गुगल क्रोम युजर्सची संख्या कोरोडो आहे. रोज करोडो युजर्स घरातील कामांपासून ऑफीसच्या प्रोजेक्टपर्यंत आणि शाळेतील अभ्यासापासून कॉलेजच्या असाईमेंटपर्यंत अनेक विषय गुगल क्रोमवर सर्च केले जातात. अगदी तुम्हाला तुमच्या बॉसला ईमेल लिहायचा असूदे नाही तर व्हिडीओ स्ट्रिम करायचा असूदे गुगल क्रोमवर सर्व कामं अगदी चुटकीसरशी केली जातात. मात्र जर तुम्ही सतत गुगल क्रोमचा वापर करत असाल तर त्याची स्पीड स्लो होते. त्यामुळे क्रोम अडकत अडकत किंवा कासवाच्या गतीने चालते. ज्यामुळे युजर्सचा अनुभव खराब होतो. याशिवाय कामासाठी वेळ देखील अधिक लागतो. तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने गुगल क्रोमची स्पीड वाढवू शकता.
नेहमी लेटेस्ट फीचर्स आणि स्मूद ब्राउझिंगसाठी गूगल क्रोमला अपडेट ठेवा. जेव्हा गुगल क्रोमचे कोणतेही अपडेट उलबब्ध होते, ते तात्काळ इंस्टॉल करा, अन्यथा तुमचा अनुभव खराब होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही बऱ्याच काळापासून गुगल क्रोम अपडेट केलं नसेल तर तात्काळ ते अपडेट करा, यामुळे तुमचा अनुभव देखील चांगला होईल आणि तुमची काम देखील लवकर होतील. (फोटो सौजन्य – Pinterest)
अनेकदा मालवेयरमुळे गूगल क्रोमची स्पीड स्लो होते. या समस्येपासून वाचण्यासाठी तुमचे आवडते कोणतेही अँटी-वायरस टूलद्वारे सिस्टम स्कॅन करत राहा. जर तुम्हाला मालवेअर आढळले तर त्वरित कारवाई करा.
गूगल क्रोममध्ये सुरक्षित आणि फास्ट ब्राउझिंगसाठी एनहँस्ड प्रोटेक्शन ऑन ठेवा. ही सिस्टन एनेबल केल्यानंतर सेटिंगमध्ये प्रायव्हसी आणि सिक्योरिटीवर जा. येथे सिक्योरिटी सेक्शनमध्ये एनहँस्ड प्रोटेक्शनचे ऑप्शन पाहायला मिळणार आहे. हे ऑप्शन इनेबल केल्यानंतर तुम्हाला फास्टर आणि सेफ ब्राउझिंग करण्यासाठी मदत होणार आहे.
Apple ने पहिल्यांदाच गाठला हा टप्पा, नव्या iPhone च्या जबरदस्त मागणीमुळे कंपनीला मिळालं मोठं यश
एक्सटेंशन ब्राउझरमध्ये अनेक कामं अगदी सहज पूर्ण केली जातात. मात्र ही कामं फंक्शन करण्यासाठी अनेक रिसोर्सेसची गरज असते. जर तुमच्या ब्राउझरमधे जास्त एक्स्टेंशन असतील तर ब्राउझरची स्पीड स्लो होऊ शकते. यासाठी तुम्हाला सर्वात आधी ब्राउझरमधील सर्व एक्स्टेंशन हटवणे अत्यंत गरजेचं आहे. तुम्हाला क्रोम पुन्हा अधिसारखा वेगाने चालावा यासाठी ब्राउझरमधील नको असलेले एक्स्टेंशन काढून टाका.
या सर्व उपायांनी देखील तुमच्या क्रोम ब्राउझरची स्पीड वाढत नसेल तर तुम्हाला ब्राउझर रिसेट करावा लागणार आहे. लक्षात ठेवा की क्रोम रिसेट करताना सेव्ह केलेले सर्व पासवर्ड, बुकमार्क्स आणि एक्सटेंशन इत्यादी डिलीट होणार आहे. यासाठी क्रोम रिसेट करण्यापूर्वी बॅकअप घ्या. क्रोम रिसेट करण्यासाठी सर्वात आधी सेटिंगमध्ये जा आणि रिसेट सेटिंग वर क्लिक करा.






