AI मॉडेल Deepseek ला चीनमध्येच आव्हान, या कंपनीने लाँच केला नवीन AI! क्षणातच देणार तुमच्या प्रश्नांची उत्तरं
तुम्हाला चीनच्या AI मॉडेल Deepseek बद्दल आठवतेय का? चीनने कमी किंमतीत AI मॉडेल तयार करून संपूर्ण जगाला धक्का दिला होता. चीनच्या या AI मॉडेलला प्रचंड प्रसिद्धी मिळत आहे. या AI मॉडेलच्या युजर्स संख्येत देखील दिवसेंदिवस वाढ होत आहे. पण या सगळ्यांसोबत Deepseek ला नवीन आव्हानाना देखील समोर जावं लागत आहे.
कमी किमतीचे AI मॉडेल्स बनवून जगाला थक्क करणाऱ्या चिनी स्टार्टअप Deepseek ला आता घरीच आव्हान मिळाले आहे. कारण, चिनी कंपनी Tencent ने त्यांचे नवीन एआय मॉडेल Hanyuan Turbo S लाँच केले आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
कंपनीचा दावा आहे की Hanyuan Turbo S डीपसीकच्या R1 मॉडेलपेक्षा वेगवान आहे आणि कोणत्याही प्रश्नाचे क्षणात उत्तरं देण्यास सक्षम आहे. Deepseek ने R1 मॉडेल अतिशय कमी किमतीत विकसित केले आहे आणि त्याने त्याच्या अनेक प्रतिस्पर्धी AI मॉडेल्सना मागे टाकले आहे. मात्र आता या R1 ला त्यांच्याच देशात नवीन आव्हान मिळालं आहे.
Tencent ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की Hanyuan Turbo S कोणत्याही प्रश्नाचे उत्तर एका सेकंदापेक्षा कमी वेळात देऊ शकते. हे खास वैशिष्ट्य त्याला इतर मॉडेल्सपेक्षा वेगळे करते. कंपनीने म्हटले आहे की AI उत्क्रांतीमध्ये, त्यांच्या मॉडेलने DeepSeek च्या V3 या मॉडेलच्या बरोबरीने कामगिरी केली.
Openai सारख्या अमेरिकन कंपन्यांना आव्हान देणाऱ्या Deepseek ला आता देशांतर्गत पातळीवर कठीण स्पर्धेचा सामना करावा लागत आहे. Tencent च्या आधी, अलिबाबा ग्रुपने त्यांचे AI मॉडेल Qwen 2.5 देखील लाँच केले होते. कंपनीचा दावा आहे की हे मॉडेल GPT 4o, Meta च्या Llama आणि DeepSeek च्या R1 मॉडेलला मागे टाकू शकते. 29 भाषांना सपोर्ट करणारे, Qwen 2.5 मजकूर, प्रतिमा आणि ऑडिओ देखील हाताळू शकते.
चीन सरकार डीपसीकच्या यशाचा आनंद साजरा करत आहे. चीन सरकारचे अनेक विभाग याचा वापर करत आहेत. त्याच्या AI मॉडेलवर तयार केलेली साधने हाँगकाँगमध्ये देखील वापरली जात आहेत. वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर, Deepseek ने पीक अवर्सनंतर त्यांच्या मॉडेलच्या वापरासाठी शुल्कात कपात करण्याची घोषणा केली आहे.
खरं तर Deepseek ला कोणीही विसरू शकत नाही. Openai ने लाँच केकेल्या जगातील पहिल्या AI चॅटबोट Chatgpt ला Deepseek ने मागे टाकलं होतं. याच कारणामुळे Deepseek ची संपूर्ण जगात चर्चा सुरू झाली. अगदी काही कालावधीतच Deepseek युजर्सच्या संख्येत प्रचंड वाढ झाली. यानंतर सुरू झाला आरोप प्रत्यारोपांचा खेळ. Openai ने चीनच्या Deepseek वर अनेक आरोप केले. शिवाय अनेक देशांनी देखील Deepseek वर प्रश्न उपस्थित करून त्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. Deepseek वर बंदी घालण्यात आली असली तरी त्याचे वर्चस्व अजून संपलेलं नाही. Deepseek ला आव्हान देण्यासाठी अनेक टेक कंपन्या त्याचं AI मॉडेल लाँच करत आहे.