अहो भूत नाही हा तर आहे रोबोट! पाणी पितो आणि माणसांची 'ही' कामही करतो, मोटार आणि बॅटरीचीही गरज नाही....
गेल्या काही काळापासून रोबोटिक्स फील्डमध्ये बराच बदल पहायला मिळाला आहे. अनेक मोठ्या टेक कंपन्या अनोखे रोबोट्स तयार करण्यात व्यस्त आहेत. कंपन्यांनी तयार केलेल्या प्रत्येक रोबोटची खासियत वेगळी असते. म्हणजेच प्रत्येक रोबोटमध्ये वेगवेगळे फीचर्स दिलेले असतात.
Elon Musk ची कंपनी टेस्ला देखील ऑप्टिमस नावाच्या एका रोबोटवर काम करत आहे. अलीकडेच अशी माहिती समोर आली होती की, OpenAI देखील असा रोबोट तयार करत आहे ज्यामध्ये मानवी कामं करण्याची क्षमता दिली जाईल. आतापर्यंत अनेक कंपन्यांनी त्यांचे रोबोट जगासमोर सादर केले आहेत. प्रत्येक रोबोटचा लूक वेगळा असतो. आता आम्ही तुम्हाला अशाच एका आगळ्यावेगळ्या रोबोटबद्दल सांगणार आहोत. हा रोबोट भुतासारखा दिसतो. अनोखी गोष्ट म्हणजे हा रोबोट पाणी देखील पितो. हा रोबोट माणसांप्रमाणे अनेक कामं करू शकतो. (फोटो सौजन्य – X)
पोलँडची कंपनी Clone Robotics या रोबोटवर काम करत आहे. हा रोबोट अगदी भुतासारखा दिसतो. कंपनीचे को-फाउंडर आणि सीईओ धनुष राधाकृष्णन यांनी सांगितलं आहे की, त्यांना एक असा रोबोट तयार करायचा होता जो sci-fi चित्रपटांमध्ये दिसणाऱ्या गोष्टी प्रत्यक्षात आणू शकेल. धनुष यांनी सांगितलं की, त्यांच्या कंपनीची सुरुवात 2021 मध्ये झाली होती. या कंपनीचा उद्देश असा होता की, त्यांना एक असा रोबोट तयार करायता आहे, जो माणसांप्रमाणे काम आणि हालचाल करू शकणार आहे. कंपनीचा रोबोट दरवाजे उघडण्यापासून ते फळे कापण्यापर्यंत सर्व काही करतो. याच कामांमुळे हा रोबोट लोकांसाठी त्यांचा साथी बनू शकतो.
Clone’s Co-founder & CEO Dhanush Radhakrishnan (@dhanushisrad) discusses building musculoskeletal androids in an interview with Anastasiia Nosova.(@AnastasiInTech) pic.twitter.com/RP0QA7v22X
— Clone (@clonerobotics) September 12, 2025
धनुष ने सांगितलं की, त्यांनी ह्यूमनॉइड रोबोट तयार करण्याची सुरुवात हातापासून केली होती. मानवी हात हा एक असा अवयव आहे, ज्याचा सर्वात जास्त वापर केला जातो. बाकी अवयवांच्या तुलनेत मानवी हात सर्वाधिक हालचाल करतो. याच सर्वांचा विचार करून कंपनीने रोबोटिक हात बनवण्याची प्रक्रिया सुरु केली. हा हात तयार करण्यासाठी कंपनीला तब्बल 18 महिन्यांचा कालावधी लागला होता. यानंतर कंपनीने एका वर्षात संपूर्ण रोबोटिक शरीर तयार केले. कंपनी सध्या या रोबोटला प्रशिक्षण देत आहे आणि अखेरीस वस्तू ओळखू शकणारी नवीन त्वचा जोडेल, ज्यामुळे नाजूक कामे देखील सोपी होतील.
बाकी रोबोट्सचा विचार करता या रोबोटमध्ये अनोख्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. इतर रोबोट्सना त्यांची काम पूर्ण करण्यासाठी जशी मोटार आणि बॅटरीची गरज असते. मात्र धनुष यांच्या कंपनीने तयार केलेला हा ह्यूमनॉइड रोबोट पाण्यावर चालतो. हे एका कॉम्पॅक्ट पंपद्वारे चालवल्या जाणाऱ्या हायड्रॉलिक सिस्टीमचा वापर करते, ज्याला कंपनी हायड्रॉलिक हार्ट म्हणते. ते रोबोटच्या स्नायूंमध्ये पाणी पंप करते. हे पाणी सिस्टीममध्येच राहते आणि गरज पडल्यास त्यात अतिरिक्त पाणी देखील घालता येते.