Upcoming Smartphones: नोव्हेंबर महिन्यात हे स्मार्टफोन्स ठोठावणार तुमचं दार, टेकप्रेमींसाठी असणार खास सरप्राईज!
तुम्ही देखील नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थोड थांबा, कारण नोव्हेंबर महिन्यात अनेक टेक कंपन्या त्यांचे नवीन स्मार्टफोन्स लाँच करणार आहेत. हे स्मार्टफोन्स बजेट रेंजपासून प्रिमियम रेंजपर्यंत असणार आहेत. या स्मार्टफोन्समध्ये Moto G67 Power 5G, Realme GT 8 Pro सह इतर अनेक स्मार्टफोन्सचा समावेश आहे. यामध्ये जबरदस्त फीचर्स देखील दिले जाणार आहेत. नोव्हेंबर महिन्यात कोणते स्मार्टफोन्स लाँच होणार, सविस्तर जाणून घेऊया.
हा स्मार्टफोन 5 नोव्हेंबर रोजी लाँच केला जाणार आहे. ऑफिशियल साइटसह हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर देखील खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनचे माइक्रोसाइट पेज देखील लाईव्ह झाले आहे. कंपनीच्या या आगामी स्मार्टफोनमध्ये 30W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7000mAh ची Silicon Carbon बॅटरी, 4K रिकॉर्डिंग सपोर्टसह पाठीमागे 50MP रियर कॅमेरा आणि 8MP अल्ट्रावाइड सेकेंडरी कॅमेरा, सेल्फीसाठी 32MP कॅमेरा आणि Snapdragon 7s Gen 2 चा प्रोसेसर देखील दिला जाणार आहे. या स्मार्टफोनची किंमत 20 हजार रुपयांपर्यंत असणार आहे. (फोटो सौजन्य – X)
13 नोव्हेंबर रोजी हा स्मार्टफोन भारतात लाँच होणार आहे. कंपनीचे हे मॉडेल अॅमेझॉनवर खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. कंपनीने या स्मार्टफोनची मायक्रोसाईट देखील लाईव्ह केली आहे. OnePlus च्या या फोनमध्ये Qualcomm चा लेटेस्ट Snapdragon 8 Elite Gen 5 चा दमदार प्रोसेसर, Android 16 वर बेस्ड एडवांस्ड OxygenOS 16 चा ऑपरेटिंग सिस्टम दिला जाणार आहे. तर पिक्चर क्वालिटीसाठी या फोनमध्ये 50MP चाा ट्रिपल रियर कॅमेरा आणि फ्रंटला 32MP सेल्फी कॅमेरा मिळणार आहे. फोनमध्ये 120W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7300mAh बॅटरी मिळणार आहे.
iQOO 15 हा स्मार्टफोन 26 नोव्हेंबर रोजी भारतात लाँच केला जाणार आहे. iQOO चा नवीन मॉडेल देखील ऑफिशियल साइट व्यतिरिक्त ई-कॉमर्स शॉपिंग साइट अॅमेझॉनवर खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. iQOO 15 मध्ये Snapdragon 8 Elite Gen 5 चा दमदार प्रोसेसर, 50MP ट्रिपल कॅमेरा, 32MP चा सेल्फी कॅमेरा, 7000mAh बॅटरी आणि 8000mm चा वेपर कुलिंग चेंबर मिळणार आहे.
हा स्मार्टफोन देखील भारतात नोव्हेंबर महिन्यात लाँच केला जाणार आहे. ऑफिशियल साइटव्यतिरिक्त ई-कॉमर्स शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर Realme GT 8 Pro Coming Soon चे पेज लाईव्ह झाले आहे. या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8 Elite Gen 5 प्रोसेसर दिला जाणार आहे.
Oppo Find X9 Series देखील नोव्हेंबर महिन्यात भारतात लाँच केली जाणार आहे. फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनचे पेज लाईव्ह झाले आहे. या स्मार्टफोनमध्ये 200MP टेलीफोटो कॅमेरा दिला जाणार आहे.
19 नोव्हेंबर रोजी हा नव्या ब्रँडचा स्मार्टफोन भारतात लाँच केला जाणार आहे. भारतीय कंपनी Indkal Technologies आता त्यांचा स्वत: चा स्मार्टफोन लाँच करणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 2.6GHz MediaTek Dimensity 7400 चिपसेट, 8GB रॅमसह 256GB पर्यंत स्टोरेज, फोटोग्राफीसाठी 50MP OIS सेंसर वाला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि 16 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा असू शकतो. याची किंमत 15 ते 20 हजार रुपयांच्या दरम्यान असणार आहे.






