नेमकं प्रकरण काय?
महाविद्यालयीन तरुणीवर चार मित्रांवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले आहे. फरान शेख, फजल शेख, रेहान शेख आणि साहिल अशी या चार मित्रांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील पीडित तरुणी ही पुण्यातल्या विमान नगर परिसरात राहायला आहे, 2025 मध्ये या तरुणीने पुण्यातील एका नामांकित कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतलं होतं. याच कॉलेजमध्ये या प्रकरणातील आरोपी असलेल्या फरान शेख याच्यासोबत तरुणीची ओळख झाली होती. हीच ओळख मैत्रीमध्ये बदलली आणि याचाच फायदा घेत फरान शेख याने वारंवार लैंगिक अत्याचार केले. असा आरोप या महाविद्यालयीन तरुणीने केला आहे.
वाघोली पोलिसांनी या प्रकरणी चार तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून चारही आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास पोलिसांकडून सुरु आहे. या घटनेनंतर पुण्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
जावयासोबत रचला मालकाला लुटण्याचा डाव; बॅग हिसकावून पळाले अन्…
विश्वासाने काम करणाऱ्या कामगारानेच जावयासोबत कट रचून मालकाची रोकड लुटीचा डाव रचल्याचा प्रकार समोर आला आहे. कर्जाच्या विळख्यातून सुटका करण्यासाठी ६ लाख ५० हजार रुपयांच्या रोकडवर डल्ला मारला होता. पण १५० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण आणि तांत्रिक तपासावरून स्वारगेट पोलिसांनी सासरा, जावई व त्यांच्या साथीदाराला अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीचा संपुर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जयंत रजनीकांत शहा (वय ५९), सोहेल अलीअहमद खान (वय ३५) आणि तौसीफ मुकीद बागवान (वय ३०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ९ जुलै रोजी रात्री आठच्या सुमारास गुलटेकडी येथील ‘हर्ष रेसिडेन्सीज’ या सोसायटीजवळ ही घटना घडली होती. ही कारवाई पोलिस उपायुक्त मिलींद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक यशवंत निकम अंमलदार नाना भांदुर्गे, सागर केकान, सागर काळे, संग्राम केंद्रे, रमेश चव्हाण, महिला पोलिस अंमलदार अनिता घायतडक यांच्यासह पथकाने केली आहे.
धक्कादायक ! वाढदिवशीच सासरच्या मंडळींनी केली जावयाची हत्या; बॅटसह काठीने केला हल्ला
Ans: चार आरोपींना.
Ans: अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची.
Ans: वाघोली पोलीस ठाणे.






